महाराष्ट्रात खरी शिवसेना कोणाची? ढाण्या वाघ कोण? या जागी ठरणार; हिंदुत्ववादी मराठी मतदार कुठं याची स्पष्टता

0

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस आता जवळ येऊ लागला आहे. अशावेळी कोण विजयी होणार आणि कोण पराजित होणार याविषयी विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते यंदाचा निकाल नक्की कोणाच्या बाजूने लागेल हे सांगणं अतिशय कठीण आहे. असं जरी असले तरी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना महाराष्ट्रामध्ये 13 ठिकाणी पहायला मिळणार आहे. यामुळे शिवसैनिक कोणासोबत आहेत? खरी शिवसेना कोणासोबत आहे? शिवसेनेचा ढाण्या वाघ नक्की कोण? हे यंदाच्या निवडणुकीमुळे स्पष्ट होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केलं. चाळीस आमदार आणि तेरा खासदार आपल्या बाजूला बळवले. पुढे जाऊन शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे दोन्हीही त्यांना मिळाले. अशावेळी खरी शिवसेना आमचीच आहे असा दावा शिवसेना एकनाथ शिंदे गट करत आहे. तर दुसरीकडे कोणीही कुठेही गेलं असलं तरी देखील शिवसैनिक आमच्यासोबत आहेत. पक्ष आणि चिन्ह त्यांनी चोरलं आहे. शिवसेना खरी आमची आहे. असा दावा ठाकरे गट करत आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

महाराष्ट्रात पाहायला गेलो तर ठाणे जिल्हा आणि महाराष्ट्रातला काही भाग वगळला तर शिवसेनेचे बहुतांश कार्यकर्ते आणि शिवसैनिक हे ठाकरेंसोबतच आहेत असे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र ठाकरेंवर कित्येक जण अजूनही नाराज असून त्यांच्या एकंदरीत कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. तर दुसरीकडे मतदार राजा आपल्या सोबत आहे असा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे.

सुरुवातीपासून जर पाहिला गेलो तर कट्टर हिंदुत्ववादी विचारधारा असणारे सर्व मतदार हे शिवसेनेसोबत असल्याचे पाहायला मिळत होते. तर मुस्लिम मतदार व अल्पसंख्यांक मतदार हा नेहमीच शिवसेने विरोधात मतदान करायचा हे चित्र होते. मात्र आता मुस्लिम मतदार यंदा ठाकरे यांना पसंती देतील असे चित्र आहे. परंतु कट्टर हिंदुत्ववादी आणि मराठी मतदार नक्की कोणाच्या बाजूने उभा राहतो हे पाहणं अतिशय उत्सुकतेच असणार आहे. यातच राज ठाकरे यांनी मोदींना दिलेल्या पाठिंबामुळे ही निवडणूक चांगलीच इंटरेस्टिंग असणार आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

सरते शेवटी, एकनाथ शिंदे यांच्याकडे धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष दोन्हीही असलं तरीदेखील ठाकरेंना मानणारा वर्ग हा महाराष्ट्रामध्ये मोठा आहे. अशावेळी एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर आपला करिष्मा कशाप्रकारे दाखवतात ? आणि ठाकरे शिंदें सोबत असणाऱ्या भाजपच्या पाठिंब्याला कशाप्रकारे अंगावर घेतात? हे पाहणं अतिशय उत्सुकतेच असून मतदार राजा नक्की कोणाला कौल देणार हे पाहणं अतिशय उपस्थितेचं असणार आहे.

या त्या १३ जागा आहेत

ठाणे- नरेश म्हस्के (शिंदे गट) विरुद्ध राजन विचारे (ठाकरे गट)

कल्याण – श्रीकांत शिंदे (शिंदे गट) विरुद्ध वैशाली दरेकर (ठाकरे गट)

उत्तर पश्चिम मुंबई – रवींद्र वायकर (शिंदे गट) विरुद्ध अमोल कीर्तीकर (ठाकरे गट)

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे (शिंदे गट) विरुद्ध अनिल देसाई (ठाकरे गट)

दक्षिण मुंबई- यामिनी जाधव (शिंदे गट) विरुद्ध अरविंद सावंत (ठाकरे गट)

नाशिक- हेमंत गोडसे (शिवसेना) विरुद्ध राजाभाऊ वाजे (ठाकरे गट)

छ. संभाजीनगर- संदिपान भुमरे (शिंदे गट) विरुद्ध चंद्रकांत खैरे (ठाकरे गट)

मावळ – श्रीरंग बारणे (र्शिद गट) विरुद्ध संजोग वाघेरे-पाटील (ठाकरे गट)

शिर्डी- सदाशिव लोखंड (शिंदे गट) विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे गट)

बुलडाणा – प्रतापराव जाधव (शिंदे गट) विरुद्ध नरेंद्र खेडेकर (ठाकरे गट)

यवतमाळ – वाशिम राजश्री पाटील (शिंदे गट) विरुद्ध संजय देशमुख (ठाकरे गट)

हिंगोली – बाबूराव कदम (शिंदे गट) विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर (ठाकरेगट)

हातकणंगले : धैर्यशील माने (शिंदे गट) विरुद्ध सत्यजीत पाटील (ठाकरे गट)