भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे

0

मुंबई दि. २० (रामदास धो. गमरे) “तथागत गौतम बुद्धांच्या जन्मानंतर अल्पवयातच त्याची आई महामाया त्यांना सोडून गेली अन अडीच हजार वर्षानंतर डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या आई भीमाई यासुद्धा भीमराव पाच वर्षाचे असताना त्यांना सोडून गेल्या अश्या या दोन महापुरुषांना आईविना जीवन व्यतीत करावं लागलं परंतु अल्पवयात जरी आई सोडून गेली आणि आईविना जरी जीवन व्यतीत करावे लागले तरी आईची प्रेरणा घेऊन हे दोन सामान्य माणूस असामान्य असे महापुरुष घडले असे म्हटलं तरी वावग ठरणार नाही. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे १८५६ ला भीमाईचा जन्म झाला तिच्या वडिलांचे नाव भिमाजी मुरडे आणि पतीचे नाव रामजी सकपाळ हे दोघे ब्रिटिश सैन्यात कामाला होते, भीमाई या अत्यंत कष्टाळू, साध्या, संस्कारी व स्वाभिमानी होत्या लहान वयातच रामजी यांच्या सोबत त्यांचं लग्न झालंत त्यांना चौदा अपत्ये झाली त्यातील चौदावे अपत्य म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर होत, भीमराव पाच वर्षाचे असताना जरी त्यांच्या आई त्यांना सोडून परलोकी गेल्या तरी आईचे संस्कार, शिस्त, स्वाभिमानी वृत्ती या गुणांचा प्रभाव भीमरावांवर पडला होता त्यातूनच प्रेरणा घेऊन ते महामानव घडले, भीमाई यांनी चाळीस वर्षाच्या जीवनात जरी चौदा अपत्ये जन्माला घातली तरी केवळ चौदाव्या अपत्याला जन्माला घालण्यासाठी जणू त्यांनी जन्म घेतला होता असे म्हटले तरी वावंग ठरणार नाही” असे प्रतिपादन राजेश घाडगे यांनी भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा आढावा घेत असताना केले. त्याचप्रमाणे परीट समाजाचे संत गाडगे बाबा यांनी तत्कालीन अंधश्रद्धा, प्रथा, रीतिरिवाज यांना मुळापासून उखडून काढण्याचे व माणसांची मने साफ, स्वच्छ व नितळ करण्याचे काम त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून केले, माधुकरी, भिक्षा मागून जीवन कंठीत असताना ही त्यांनी चौदा शाळा, अनेक धर्मशाळा निर्माण केल्या त्यांच्या जीवनप्रवासावर ही जितक बोलू ते थोडं आहे, गाडगे महाराज यांच बाबासाहेबांवर विशेष स्नेह व अतूट नात होत, गाडगे महाराजांच कीर्तन सुरू असताना त्यांचा मुलगा वारला अशी बातमी आली असता ते म्हणाले “समाजातील कैक मुले गेली तरी मी कोणासाठी रडू” अस ते म्हणाले आपला मुलगा गेला हे स्वतःच दुःख बाजूला सारून एक अश्रू न ढाळता समाजासाठी जगणारा इतक्या मोठ्या माणूस जेव्हा बाबासाहेब गेले ही बातमी कळली तेव्हा त्यांनी अन्नपाण्याचा त्याग करून आठ दिवसात त्यांनी ही जगाचा निरोप घेतला अश्या गाडगे महाराजांच्या जीवनावर ही जेवढ बोलू तितक थोडं आहे” असे प्रतिपादन माता भीमाई व संत गाडगे महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त बोलत असताना राजेश घाडगे यांनी केले व माता भीमाई व संत गाडगे महाराज व माजी सभापती आर. बी. रुके यांना मानवंदना दिली.

अधिक वाचा  ….वारजे बदलतंय! केंद्रीय मंत्री ‘ॲक्टिव्ह’ पारंपारिक कट्टर विरोधक एकत्र विसावले!; सर्वांची गणिते बिघडली!

बौद्धजन पंचायत समिती व संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने माता भीमाई रामजी आंबेडकर, संत गाडगे महाराज व माजी सभापती आर. बी. रुके या तिघांच्या स्मृतिदिनानिमित्त राजेश घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार व सचिव मनोहर बा. मोरे यांनी महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आपल्या सुमधुर वाणीने धार्मिक विधी पठण केली, सदर प्रसंगी विवाह मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, निवडणूक मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जाधव, संस्कार समिती अध्यक्ष मंगेश पवार, सचिव मनोहर बा. मोरे, बौद्धाचार्य पवार गुरुजी, प्रदीप तांबे, आदी अनेक मान्यवर, सभासद, उपासक, उपासिका उपस्थित होते. सरतेशेवटी माता भीमाई, संत गाडगे महाराज व माजी सभापती आर. बी. रुके यांना मानवंदना देऊन सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांना मंगलकामना व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?