गुहागर तालुक्याची सुकन्या आर्या मनोज जाधव “भीमकन्या गौरव पुरस्कार २०२५” ने सन्मानित

0

मुंबई दि. ३० (रामदास धो. गमरे) बौद्धजन सहकारी संघ (रजि.) मुंबई, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा वर्षावास प्रवचन मालिका सालाबादप्रमाणे याही वर्षी मुंबईमध्ये Google Meet app द्वारे ऑनलाईन पद्धतीने व गाव शाखेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, शृंगारतळी येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली होती, सदर वर्षावास प्रवचन मालिका २०२५ चा सांगता समारंभ मुंबई शाखा अध्यक्ष सुरेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली बालमित्र क्रीडा मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, जुनी बी. डी. डी. चाळ ३ अ व ४ अ च्या मध्ये, नायगाव, दादर (पूर्व), मुंबई – १४ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी ज्योत प्रज्वलित करून संस्कार समितीचे अध्यक्ष संदीप गमरे व ग्रुप यांनी सुश्राव्य व सुमधूर वाणीने बुद्धवंदना पठण करून कार्यक्रमास प्रारंभ केला, सरचिटणीस संदेश गमरे व संस्कार समितीचे चिटणीस सचिन मोहिते यांनी यांनी आपल्या पहाडी आवाजात लाघवी व ओघवत्या भाषाशैलीत बहारदार असे सूत्रसंचालन केले तर संस्कार समितीचे अध्यक्ष संदीप गमरे यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले, तालुका चेअरमन दीपक मोहिते यांनी प्रास्ताविक सादर करत असताना गेल्या आठ वर्षाच्या कालावधीत बौद्धजन सहकारी संघाच्या मार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा लेखाजोखा सादर केला व हे सर्व आपल्या पाठिंब्यामुळे व अमूल्य साथीमुळे तालुक्याची आर्थिक घडी बसवत संघटना संघटित ठेवता आली यावर्षी तालुक्यातील कु. आर्या मनोज जाधव (गुहागर) हिने राष्ट्रीय स्तरावरील हिंदी वक्तृत्व स्पर्धेत ५००० विद्यार्थ्यांमधून देशात चौथा तर महाराष्ट्र राज्यात पहिला क्रमांक पटकावला, कु. निधी राजेश पवार (वरवेली) हिने कंपनी सेक्रेटरी (CS) परीक्षेत देशभरातून लाखो उमेदवारांमधून २४ वा क्रमांक पटकावला, कु. पूनम संतोष मोहिते (कौंढर-काळसूर) हिची राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत जिल्हा संघाचे नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आली, कु. डॉ. मधुरीमा जाधव हिची महाराष्ट्र शासन मत्स्य विभागात सहाय्यक आयुक्त पदी नियुक्ती झाली, कु. सुषमा विजय जाधव हिची न्यायाधीश पदी नियुक्ती झाली अशी भव्यदिव्य नेत्रदीपक तालुक्यातील विद्यार्थ्यांनीनी केल्याबद्दल प्रथमच “भीमकन्या गौरव पुरस्कार – २०२५” आपण याठिकाणी जाहीर करत आहोत, मुंबईस्थित विद्यार्थ्यांचा गुणगौरव डिसेंबर २०२५ मध्ये करण्यात येणार असून, ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आज आयोजित करण्यात आला आहे असे नमूद केले. तसेच सदर वर्षावास प्रवचन मालिकेत ज्या ज्या वक्त्यांनी विविध प्रकारचे वेगवेगळे विषय हाताळून समाजाला योग्य दिशा देण्यासाठी व धम्मप्रचार, धम्मप्रसार करण्यासाठी वेळात वेळ काढून हजर राहिल्याबद्दल सर्व वक्त्यांना व मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

सदर प्रसंगी गुहागर तालुक्याची सुकन्या आर्या मनोज जाधव हिला “भीमकन्या गौरव पुरस्कार २०२५” देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळी सत्काराबद्दल आभार व्यक्त करताना कु. आर्या जाधव हिने हिंदी व इंग्रजी भाषेतून, कु. निधी राजेश पवार हिने इंग्रजी भाषेतून आपले विचार मांडून सदर स्पर्धा या मेहनत घेतली तर अत्यंत सोप्या आहेत त्याकरता कश्या पद्धतीने अभ्यास करायला हवा यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले.

सदर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संजय पवार यांनी “बौद्ध धम्म आणि धम्माची ओळख” या विषयावर बोलत असताना बुद्ध म्हणजे ज्ञान, पंचशील, अष्टशील, दशशील आणि आर्यअष्टांग मार्ग यावर मनन, चिंतन करून त्यांना आपल्या जीवनात उतरवल तर आपण बुद्धाच्या आदर्शमार्गावर चालू शकतो हीच खरी आदर्श जीवनपद्धत आहे असे मौलिक विचार अनेक सौंदहरणासह मांडून सर्वांना गोडवाणीने मार्गदर्शन केले.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

सदर प्रसंगी प्रमुख विश्वस्त सिद्धार्थ पवार, दीपक जाधव, पांडुरंग गमरे, माजी विश्वस्त संजय पवार, के. सी. जाधव, सुशील जाधव, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, उपकार्याध्यक्ष अशोक कदम, माजी उपकार्याध्यक्ष प्रभाकर पवार, गाव शाखेचे माजी चिटणीस विश्वास मोहिते, मुंबई कोषाध्यक्ष प्रदीप कदम, शिक्षण समितीचे अध्यक्ष संजीवनी यादव, न्यायदान कमिटीचे अध्यक्ष शशिकांत मोहिते, विभाग अधिकारी संतोष पवार, किशोर जाधव, शैलेश जाधव, राजेश पवार, मनोहर जाधव गुरुजी, गुहागर शाखेचे अध्यक्ष राहुल कदम त्यांचे सहकारी, सदस्य रुपेश सावंत, प्रत्येक शाखेचे अध्यक्ष, सात विभागाचे विभाग अधिकारी, मध्यवर्ती कमिटी, आजी माजी विश्वस्त, आजी माजी कार्यकर्ते, महिला मंडळ आदी तुफान पावसाची पर्वा न करता मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व उपस्थितांचे आभार मानून सरचिटणीस संदेश गमरे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता