महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार! पण पुरपाहणी शक्य नाही तर…; मुख्यमंत्र्यांनी खरं कारण सांगून तारीखही सांगितली

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहीने एक निवेदन दिले आहे. आम्ही त्यांना महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती ची माहिती त्यांना दिली आहे.महाराष्ट्रात पावसामुळे किती नुकसान झाले आहे, हे त्यांना आम्ही सांगितले आहे. आम्ही त्यांना एनडीआरएफच्या माध्यमातून मदत करण्याची विनंती केली आहे. आमच्या विनंतीला त्यांनी सकारात्मकता दाखवली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. पंतप्रधानांनी आम्हाला सांगितलं की, लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या. प्रस्ताव आला की, आम्ही त्यावर अंमलबजावणी करू. तसेच लवकरात लवकर जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही करू, असं आश्वासन पंतप्रधानांनी आम्हाला दिले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. तसेच नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. याची तारीखही त्यांनी यावेळी सांगितली आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तसेच आम्ही पंतप्रधानांकडे महाराष्ट्र डिफेंस कॉरिडॉरसाठी सादरीकरण केले आहे. ज्यात त्यांना सांगितले की, एक डिफेंस मॅन्युफक्चरिंगची इको सिस्टीम महाराष्ट्रात तयार होत आहे. ज्यामुळे डिफेंस मॅन्युफक्चरिंगला बुस्ट मिळणार आहे. त्यातून अर्थव्यवस्थेला फायदा होणार आहे. तसेच यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. महाराष्ट्रात तीन ठिकाणी हा कॉरिडॉर करता येणार आहे.

यात पहिला भाग पुणे, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर इथे करता येईल. तर दुसरा भाग नाशिक आणि धुळ्यातील भागात करता येऊ शकतो. तसेच कॉरिडोरचा तिसरा भाग नाशिक वर्धा अमरावती या भागात करता येईल. तर अशाप्रकार तिन्ही ठिकाणी कसे करता येईल, याची माहिती आम्ही पंतप्रधानांना दिली आहे. याच्यावरही त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

ते म्हणाले की, तर दुसरीकडे गडचिरोलीमध्ये देशातील सर्वात स्वस्त स्टील तयार करू शकतो. चीनपेक्षाही कमी भावाने स्टील आपण तयार करू शकतो. या सोबतच ग्रीन स्टील तयार करण्याची माहिती मी मांडली आहे. आपल्याला गडचिरोलीला एक स्टील हब तयार करायचा आहे. यामुळे महाराष्ट्राला स्टील उद्योगात मोठा बुस्ट मिळणार आहे. याकडेही पंतप्रधानांनी सकारात्मक भूमिका दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, व्यवसायात महाराष्ट्र काय करतो आहे, या संदर्भातील माहिती मी नरेंद्र मोदींना दिली आहे. तसेच कशाप्रकारे आम्ही अधिक सुलभता आणण्याचा प्रयत्न करत आहोत, याबाबत सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ आणि ९ ऑक्टोंबरला महाराष्ट्रात येणार आहेत. पूरपरिस्थितीच्या संदर्भात हा दौरा असणार नाही. एक मोठे इंटरनॅशनल फिनटेक फेस्टीवल होत आहे. या फेस्टिवलमध्ये जगभरातील लोक येणार आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटेनचे प्रधानमंत्री महाराष्ट्रात येणार आहेत. महाराष्ट्र आता फिनटेकची राजधानी बनत आहे. फिनटेकमधील सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे. त्यामुळे हे फिनटेक फेस्टिवल महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहे. यासाठी ते येणार आहेत.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार