थेट रोहिणी खडसे वकिली कोट घालून न्यायालयात, ईशा सिंगचा वापर खेवलकरांना अडकवण्यास, वकिलांचा युक्तिवाद

0

पुणे : पुण्यातील एका रुममध्ये सुरु असलेल्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकत सात जणांना अटक केली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांचे जावई आणि महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांचा समावेश होता. पुणे पोलिसांनी ही कारवाई 27 जुलै रोजी केली होती. आज त्या सर्वांची पोलीस कोठडी संपत असल्यानं सर्व आरोपींना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. रोहिणी खडसे या ठिकाणी स्वत: पोलिसाचा कोट घालून न्यायालयात आल्या आहेत. पुणे पोलिसांनी आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली. तर, प्रांजल खेवलकरांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी खेवलकर यांना अडकवण्यासाठी ईशा सिंगचा वापर केल्याचा युक्तिवाद केला आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

रोहिणी खडसे वकिलीचा कोट घालून कोर्टात

प्रांजल खेवलकर यांच्यासह सात आरोपींना पोलीस कोठडी संपल्याने पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात हजर करण्यात आलं आहे‌. या सुनावणीसाठी रोहिणी खडसे या स्वत: वकिलीचा कोट घालून न्यायालयात आल्या आहेत. त्या पती प्रांजल खेवलकर यांच्यासाठी न्यायालयात वकील म्हणून युक्तीवाद करण्याची शक्यता आहे. रोहिणी खडसे यांच्याकडे वकिलीची सनद आहे. रोहिणी खडसे यांच्या सोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या रुपाली पाटील देखील वकिलीचा काळा कोट घालून युक्तिवाद करण्यासाठी न्यायालयात आल्या आहेत.

पुरुष आरोपींची  कोठडी वाढवा, तपास अधिकाऱ्यांची मागणी

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

तपास अधिकारी यांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीप्रमाणे तपासात राहुल नावाचा नवीन व्यक्ती असल्याची माहिती मिळाली आहे. तो हुक्का भरण्याच काम करत होता. त्याचा शोध घ्यायचा आहे. अंमली पदार्थ कोठून आणले याबाबत आरोपी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. त्यासाठी त्यांच्याकडे चौकशी करायची आहे. सातपैकी अटक असलेल्या दोन महिला आरोपींची पोलीस कोठडी सध्या गरजेची नाही. या दोन महिला आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी. मात्र, पाच पुरुष आरोपींकडे आणखी चौकशी करायची असल्याने त्यांची पोलीस कोठडी मिळावी. आरोपींकडून इलेक्ट्रॉनिक गॅझेटस जप्त करण्यात आली आहेत. त्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी मिळावी.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

प्रांजल खेवलकरांनी अंमली पदार्थाचं सेवन केलं नाही: विजयसिंह ठोंबरे

प्रांजल खेवलकरांकडून वकील विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले की दोन महिला आरोपींकडे अंमली पदार्थ देऊन प्रांजल खेवलकर यांना अडकवण्यात आले आहे. इशा सिंग हिच्या पर्समधे सिगारेटच्या रिकाम्या पाकीटात कोकेन सापडले आहे. इशा सिंगला प्लांट करण्यात आले होते. पोलीस आता त्या दोन महिला आरोपींना पोलीस न्यायालयीन कोठडीची मागणी करतायत आणि प्रांजल खेवलकर यांची मात्र पोलीस कोठडी मागतायत. प्रांजल खेवलकर यांनी अंमली पदार्थांच सेवन केलेले नाही आणि त्यांच्याकडे अंमली पदार्थ सापडलेले देखील नाहीत. अंमली पदार्थांचा फॉरेन्सीक रिपोर्ट मुद्दामहुन लवकर येत नाही.