बीड बनतंय ‘गुन्हेगारीचं हब’! कराडनंतर सुरेश धसांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी समोर, व्यक्तीला अमानुष मारहाण

0

बीडमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. यात एका माणसाला तीन ते चार लोक मारहाण करत आहेत. ही माणसे भाजप आमदार सुरेश धस यांचे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात आहे.त्यांनी केलेल्या गुंडगिरीच्या घटनेचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केला आहे. यानंतर आता पुन्हा खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्त्या अजंली दमानिया यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यात एका माणसाला मारहाण होत असल्याचे दिसून येत आहे. तीन ते चार लोक त्याला अमानुष मारहाण करत आहेत. हे लोक सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहेत. तसेच बीडमधील भाजपचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. अंजली दमानिया यांनी या घटनेला वाचा फोडली आहे. त्यांनी व्हिडिओ ट्विट करत मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ७४१ च्या वतीने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

अंजली दमानियांनी ट्विट करत म्हटलंय की, बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील अमानुष मारहाणीचा हा व्हिडिओ पहा. अद्याप शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. हे काय आहे काय ? गृहमंत्र्यांनी आणि सुरेश धस यांनी उत्तर द्यावे. हा मारणारा माणूस सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे का ? बीडच्या शिरूर तालुक्यात गुंडगिरीचा हा व्हिडीओ पहा… असं त्या म्हणाल्या आहेत.

https://x.com/anjali_damania/status/1897285320149991426?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1897285320149991426%7Ctwgr%5Efd817a499ac3d501cd3e8b1161e5bea9371dbea1%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ ट्विट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार सुरेश धस यांना सवाल विचारला आहे. बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील हा व्हिडिओ आहे. आता या प्रकरणी वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहे.

अधिक वाचा  जनशक्ती पुढे महाशक्ती पराभूत! जैन बोर्डिंग व्यवहार रद्द होणार, नैतिकता अखेर जागृत व्यवहारातून बाहेर पडण्याचा विशाल गोखलेंचा निर्णय