बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ७४१ च्या वतीने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

0

पनवेल दि. २५ (रामदास धो. गमरे) बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ७४१, खांदा कॉलनी, माता रमाई महिला मंडळ व तक्षशिला तरुण मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि कौटुंबिक मेळावा नथुराम साखरे यांच्या अध्यक्षतेखाली तक्षशिला बुद्ध विहार, खांदा कॉलनी येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा सोनू जाधव यांनी केले. सदर प्रसंगी पनवेल विधानसभेचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांना बुद्धमुर्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. मार्गदर्शन करताना त्यांनी समाजातील शैक्षणिक व सामाजिक विकासात अशा उपक्रमांचे महत्व अधोरेखित केले.

अधिक वाचा  नवे सरन्यायाधीश म्हणून यांच्या नावाची आज शिफारस; सरन्यायाधीश CJI भूषण गवईंनी नावही सांगितले

माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड आणि गणेश पाटील हे मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित होते. बौद्धजन पंचायत समितीचे खजिनदार नागसेन सुरेश गमरे यांनी धम्मकार्याचे महत्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांचे आणि मान्यवरांचे अभिनंदन केले, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेल शहराध्यक्ष किशोर देवदेकर यांनी महिलांना बचत गट, शासकीय योजना आणि घरगुती उद्योगांबाबत मार्गदर्शन केले. वैज्ञानिक शिवदास वाघमारे यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व प्रगतीशील शिक्षणाची गरज अधोरेखित केली.

तक्षशिला सामाजिक संस्था (रजि.) चे अध्यक्ष अंकुश मोहिते यांनी संस्थेच्या सामाजिक कार्यांविषयी माहिती दिली तसेच कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सचिव अभिजित अशोक जाधव यांनी केले.

अधिक वाचा  दिवाळीचा पुणे मेट्रोला ‘झटका’! आर्थिक गणित बिघडले प्रवासी संख्या २.३६ लाखांवरून थेट १२ हजारांवर

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या उपाध्यक्ष भगवान कांबळे, उपसचिव प्रशांत गमरे, खजिनदार जिनवास कदम, संदेशवाहक विक्रम गमरे, तसेच महिला मंडळाच्या उपाध्यक्षा स्वाती गमरे, सचिव स्मिता कदम, उपसचिव सीता जाधव, खजिनदार सुवर्णा साखरे, संदेशवाहक अश्विनी जाधव यांसह तक्षशिला तरुण मित्र मंडळाचे अल्पेश गमरे, यादव, आकाश कदम, निखिल गमरे, निलेश भिंगारे, बिपिन जाधव तसेच सर्व तीनही संस्थांचे पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.