बुद्धाने आपल्या वाणीतून पंचशील दिले तोच लोकशाहीचा पाया आहे – उत्तमराव खोब्रागडे

0
30

मुंबई दि. ११ (रामदास धो. गमरे) “धम्म आणि धर्म या दोन वेगवेगळ्या विचारधारा असून जीवनातील सर्वच गोष्टी या देवांमुळे घडतात या संकल्पनेतून माणसाला बांधून ठेवणारी व समाजात उच्च-नीच भेद करणारी, अंधश्रद्धा, अराजकता निर्माण करणारी विचारधारा म्हणजेच धर्म होय, तर माणसाने माणसासारखे वागणे, समाज एकसंध करणे, समाजाचा विकास करणे, माणसा माणसात भेद न मानणे, दुसऱ्याबद्दल वाईट न चिंतने, इतरांच्या जागेवर, संपत्तीवर वाईट नजर न ठेवणे, राष्ट्रप्रेम बाळगणे, राष्ट्राचे रक्षण करणे हे सर्वांगीण सर्वसामान्य सामाजिक तत्व म्हणजेच धम्म होय. बुद्धाने आपल्या वाणीतून पंचशील दिले त्यात दुःख, दुःखाचे कारण आणि ते निवारण्याचे मार्ग, राष्ट्रनिर्मिती व त्याचे संरक्षण करणे, माणूस हा केंद्रबिंदू मानून सामाजिक समता, प्रेम, मैत्री या आचरणाने ही तत्व अंगीकारून ती प्रत्यक्षात उतरवून आपला विकास करणे, आर्य अष्टांगमार्ग, चार तत्व, इतर उप आठ त्याचप्रमाणे पंचशीलाचे पालन करणारा माणूस म्हणजेच बौद्ध होय, बौद्ध ही कोणती जात, धर्म, पंथ नसून बौद्ध म्हणजेच ज्ञानी व त्यालाच पाली भाषेत ब्राम्हण म्हटले आहे म्हणून पंचशील हे लोकशाहीचा पाया आहे” असे प्रतिपादन IAS अधिकारी उत्तमराव खोब्रागडे यांनी बौद्ध धर्माचे तत्वज्ञान या विषयावर वर्षावास प्रवचन मालिकेचे प्रथम पुष्प गुंफत असताना केले.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत धम्म प्रवचन मालिकेचे आयोजन इंदू मिलचे प्रणेते, सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे सरचिटणीस राजेश घाडगे आणि संस्कार समितीचे चिटणीस मनोहर बा. मोरे यांनी आपल्या सुस्पष्ट, पहाडी आवाजात केले, तर संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी प्रास्ताविक सादर करताना सदर कार्यक्रमाची रूपरेषा व नियोजन याची मांडणी करून कार्यक्रमाची सुरवात केली.

सदर प्रसंगी अध्यक्षीय भाषणात सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी “भगवान गौतम बुद्ध हे वैज्ञानिक असून त्यांना जगातील पहिला वैज्ञानिक ही म्हणता येईल, माझ्या वाचनात असे आले आहे की शंभर वर्षानंतर माणूस हा स्वतः देवाचा निर्माता आहे असे मानेल कारण जग हे विज्ञानवादी असून इतक्या जलदगतीने पुढे जात आहे की लवकरच मोठी वैज्ञानिक क्रांती घडू शकेल, माणसाच्या डोक्यातील मेंदू तसाच शाबूत ठेवून निष्क्रिय झालेले अवयव बदलून माणसाला अजरामर करण्याचे संशोधन सुरू आहे हे प्रयोग यशस्वी झाल्यास माणूस अमर मी स्वतःच देव असून देवाचा निर्माता ही मीच आहे अशी संकल्पना पुढे येऊ शकते या वैज्ञानिक मार्गाने चालणारा एकमेव धर्म हा बौद्ध धम्म असून शंभर वर्षानंतर इतर सर्वच धर्म लोप पावतील आणि वैज्ञानिक तत्वांवर चालणारा विज्ञानवादी बौद्ध धम्मच कायमस्वरूपी टिकून राहील अशी माझी खात्री आहे, आज सनदि अधिकारी उत्तमराव खोब्रागडे यांनी बौद्ध धम्म आणि त्याची तत्व या विषयावर अत्यंत मार्मिक असे उदाहरणांसह विश्लेषण देऊन स्पष्ट केली आहेत त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो” असे प्रतिपादन केले.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

सदर कार्यक्रमास समितीचे उपसभापती विनोद मोरे, कार्याध्यक्ष व स्वागताध्यक्ष लक्ष्मण भगत, माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे, उपकार्याध्यक्ष अशोक बा. तांबे, एच. आर. पवार, मनोहर सखाराम मोरे, चंद्रमणी तांबे, सरचिटणीस राजेश घाडगे, खजिनदार नागसेन गमरे, अतिरिक्त चिटणीस विठ्ठल जाधव, श्रीधर साळवी, चिटणीस रवींद्र शिंदे, लवेश तांबे, यशवंत कदम, अनिरुद्ध जाधव, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुशीलाताई जाधव, चिटणीस अंजलीताई मोहिते, उपकार्याध्यक्षा प्रमिलाताई मर्चंडे, विश्वस्त राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, मंगेश शिवराम पवार, गोविंद तांबे, निवडणूक समितीचे मिलिंद जाधव, तुकाराम घाडगे, अतुल साळवी, व्यवस्थापक मंडळाचे विश्वस्त, शाखांचे कार्यकर्ते, जेष्ठ-कनिष्ठ बौद्धाचार्य, बौद्धाचार्या, उपासक, उपासिका आदी विविध क्षेत्रातील मान्यवर सदर कार्यक्रमास उपस्थित होते, भीम अनुयायींच्या उस्फुर्त प्रतिसादात सदर कार्यक्रम संपन्न झाला सदर उपस्थितांस गटक्रमांक १चे गटप्रतिनिधी मंगेश शिवराम पवार यांनी खीरदान केल्याबद्दल संस्कार समितीचे चिटणीस मनोहर बा. मोरे यांनी त्यांचे कौतुक करून आभार मानले तद्नंतर दिवंगत बौद्धाचार्य नारायण जाधव, निवडणूक अधिकारी गोकुळ जाधव व या महिन्याच्या कालावधीत जे जे मान्यवर कार्यकर्ते पडद्याआड गेले अश्या सर्वाना भावनिक होऊन श्रद्धांजली अर्पण करून संस्कार समितीचे चिटणीस मनोहर बा. मोरे यांनी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ