‘मशाली’च्या साक्षीत कोथरूड ‘भगवा’मय; आपणच जिवा-भावाचे अन् हक्काचे एकत्र विकासाची मशाल पेटवू: चंद्रकांत मोकाटे

0

कोथरूड विधानसभा मतदारसंघात रुग्णांवर उपचारासाठी मोठे रुग्णालय नसल्याने नागरिकांची मोठी कुचंबना होते. ही समस्या दूर करण्यासाठी आपण निवडून आल्यानंतर सर्वप्रथम बालेवाडीत ससून रुग्णालयाच्या धर्तीवर 800 खाटांचे रुग्णालय उभारणार असून ते माझे गोरगरीबांसाठी स्वप्न आहे. असे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार श्री चंद्रकांत मोकाटे यांनी नागरिकांबरोबर संवाद साधताना सांगितले.

आज प्रचाराची सांगता करताना त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. तत्पूर्वी त्यांची मतदारसंघात भव्य दुचाकी रॅली काढून मतदारांशी संपर्क साधण्यात आला. नागरिकांनी त्यांचे हात उंचावून उत्स्फूर्तपणे स्वागत केले. महिलांनी ठिकठिकाणी त्यांना ओवाळून त्यांचे औक्षण केले तुम्हीच निवडून येणार. आमचे आमदार तुम्हीच अशा मनापासून नागरिकांनी, महिलांनी, तरुण, तरुणीनी श्री मोकाटे यांना शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा  पवारांना सोडताच प्रशांत जगतापांचा पक्ष अन् 2029 चे मोठे लक्ष्य ठरल; मुंबईत यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?

श्री मोकाटे यांच्यासमवेत अनेक तरुण- तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक, प्रौढ तसेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आपचे कार्यकर्ते उत्साहात दुचाकी वाहनावर स्वर होऊन टुव्हीलर रॅलीत सहभागी झाले. श्री मोकाटे यांच्यासोबत प्रकाशतात्या बालवडकर, प्रशांत बधे, गजानन थरकुडे, माजी नगरसेविका वैशाली मराठे, माजी नगरसेवक चंदू कदम, राजेश पळसकर, नंदू दिघे, भगवान कडू, प्रकाश साबळे, आदी या टुव्हीलर रॅलीत सहभागी झाले होते.

सकाळी 11 वाजता कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर टुव्हीलर रॅलीस प्रारंभ झाला. कर्वे रस्त्याने ही रॅली मृत्युंजय मंदिर,मयूर कॉलनी, परमहंस नगर, शिक्षक नगर, शिवतीर्थ नगर, रामबाग कॉलनी, मोरे विद्यालय, पौड रोड, पटवर्धन बाग, गणेश नगर, डहाणूकर कॉलनी चौक, कुमार परिसर रोड मार्गे आशिष गार्डन चौक, गुजरात कॉलनी, आदी मार्गाने पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात आली आणि टुव्हीलर रॅलीची सांगता करण्यात आली.

अधिक वाचा  भाजपच्या पुणे ‘सर्जिकल स्ट्राईक’ नंतर कोअर कमिटीत 100 नावांवर एकमत ; आधी आपला बाब्या अन् नंतर….?

यावेळी नागरिकांशी संवाद साधताना श्री मोकाटे म्हणाले की, कोथरूड, सुतारवाडी, पाषाण, बाणेर, बालेवाडी, कर्वेनगर, पौड रस्ता परिसरात मुलांना खेळण्यासाठी क्रिडांगण व मैदाने विकसित करण्याचा आपला संकल्प आहे. पौड फाटा, करिष्मा चौक, वनदेवी चौक, वारजे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, भुसारी कॉलनी, आदी परिसरातील वाहतूक समस्या दूर करण्यासाठी आपण प्राधान्य देणार असल्याचे श्री मोकाटे यांनी यावेळी सांगितले. नाट्य, चित्रपट, संगीत, कला, क्रीडा, साहित्य आदिसाठी शासनाच्या विविध योजना राबविण्यात येणार आहे. मेट्रो चांदणी चौकापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री मोकाटे म्हणाले.