भिमराव तापकीरांच्या रॅलीला ‘धनकवडी’त अभूतपूर्व प्रतिसाद; जनसेवेची खुर्ची हिसकावण्याऱ्या ‘मतलबी गँग’ला अयशस्वी करण्याचे जनतेला समारोपात आवाहन : भीमराव तापकीर

0

खडकवासला विधानसभा मतदारसंघ निवडणूक जाहीर झाल्यापासून जनसेवेत अविरत असलेल्या भिमराव तापकीरांच्या कार्यशलीवर टीका करत प्रचाराची राळ उठवणारी ‘मतलबी गॅंग’ मतदार संघामध्ये फिरत आहेत परंतु त्यांचे हेतू आणि मनसुबे जनसेवेचे नसून काहींना अतोनात प्रयत्न केल्यानंतरही ‘विजय’ मिळत नसल्याचे दुःख सतावत आहे. तरी एक श्रावण बाळ असा निर्माण झाला आहे ज्याच्या सख्ख्या चुलत्याने जिल्हा परिषदेचे क्रमांक दोनचे महत्वाचे सत्तेचे पद भोगलं आणि ज्याची बहीण (युती धर्म न पाळलेली पडद्यामागली बाहुली) महापालिकेच्या सत्तेत होती तरीही यांना जनहिताची कामे करता आली नाहीत ही जनसेवेची खुर्ची हिसकावण्याऱ्या ‘मतलबी गँग’ला अयशस्वी करण्याचे जनतेला समारोपात आवाहन भीमराव तापकीर यांनी केले आहे. भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार भिमराव धोंडिबा तापकीर यांनी आज खडकवासला मतदारसंघात विविध भागांतून भव्य बाईक रॅली आणि पदयात्रा आयोजित केली. त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या व मतदारसंघाच्या प्रगतीसाठी आपले दृष्टिकोन स्पष्ट केले.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

कार्यक्रमाचा प्रारंभ सकाळी 8.45 वाजता धनकवडी, बालाजीनगर आणि भारती विद्यापीठ परिसरातून भव्य बाईक रॅलीला सुरुवात झाली. श्री जानुबाई मंदिर, तळजाई पठार, संभाजी नगर, तापकीट स्मृती, चैतन्यनगर, विद्यानगरी, कात्रज डेअरी, वंडर सिटी, नारायणी धाम भागात मा.उपमहापौर दत्तभाऊ धनकवडे, मा.नगरसेविका वर्षाताई तापकीर, मा.नगरसेविका अश्विनीताई भागवत, राणीताई भोसले, मोहिनीताई देवकर, आप्पासाहेब धावणे, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष अरुण राजवाडे, संतोष फरांदे, विश्वास आहेर, युवराज रेणूसे, शंकर कडू, अभिषेक तापकीर, सचिन बदक, गणेश पवार, सागर भागवत, सागर साबळे, आनंद शिंदे, दत्ता सावंत, अंकुश सोनवले, महेश भोसले, सत्यवान कामठे, सतिश घाटे, उल्हास खुटवड,दादा देवकर, पांडुरंग भोसले, सामाजिक कार्यकर्ते दिगंबर डवरी, प्रभाग अध्यक्ष अमोल चौधरी, रायबा भोसले, भाजपा सरचिटणीस युवा मोर्चा ओंकार डवरी, जितू कोंढरे, चिन्मय भोसले, राहुल पाखरे, रितेश रासकर, आनंद साळुंखे, अंकुश कोकाटे, मंगेश पवार, तसेच इतर मान्यवर कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

यावेळी मतदारांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर उपाययोजनांसाठी सकारात्मक दृष्टिकोन मांडला. अशा उत्साहपूर्ण बाईक रॅलीने नागरिकांमध्ये विश्वास आणि ऊर्जा निर्माण केली. सामाजिक सेवा व लोककल्याणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विकास कामांची रूपरेषा सादर केली. “खडकवासला मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेचा पाठिंबा महत्त्वाचा आहे. या भागाचा विकास आणि प्रगती हेच माझे ध्येय आहे. जनतेच्या विश्वासामुळे विजय निश्‍चित आहे.” जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्थानीय नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत तापकीर यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला. मतदारसंघाच्या विकासाच्या दिशेने त्यांच्या योजनांना प्रभागातील जनतेची मान्यता मिळाली आहे असे भिमराव तापकीर यांनी सांगितले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती