घोटवडेफाटा सभेसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी; तुमचे मीठ खाल्ल आहे विकासच करणार हा माझा शब्द- किरण दगडे पाटील

0

भोर विधानसभा मतदार संघाच्या मतदार संघाचा विकासच करणार हा माझा शब्द आहे असे प्रतिपादन किरण दगडे पाटील यांनी पिरंगुट येथील प्रचार सभेमध्ये नागरिकांना केले. घोटवडे फाटा येथे झालेल्या प्रचंड मोठ्या सभेला संबोधताना किरण दगडे पाटील बोलत होते. यावेळी अनेक सर्वसामान्य महिलांनी किरण दगडे पाटीलच निवडून येणार आम्ही त्यांनाच निवडून आणणार असा विश्वास व्यक्त करत त्यांना आशीर्वाद दिले.

किरण दगडे पाटील पुढे म्हणाले की तीन तालुक्यांचा विकास करण्यासाठी आलोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली त्या रायरेश्वराचं मंदिर सुद्धा साध्या पत्र्यांचं आहे. तिथे जायला रस्ता चांगला नाही. उलट तिथली जागा घ्यायचं काम लोकप्रतिनिधीने केलं आहे. भोरमध्ये बिकट परिस्थिती असून तालुका 25 वर्षे मागासलेला आहे, वेल्ह्यात ५-५ किलोमीटर मुलांना शाळेत चालत जावं लागतंय. ४० वर्षात त्यांना काम करता आलं नाही, ते करायला आलोय. संपूर्ण देशासाठी सर्वात मोठं योगदान भोर, राजगड (वेल्हे) आणि मुळशी तालुक्यांचं आहे, मात्र या तीन तालुक्यांची अवस्था आज मात्र बिकट आहे, हे केवढं मोठं दुर्दैव आहे. मला चांगलं काम करायचं आहे म्हणून मी आलो आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

मी भाग्यवान आहे की, माझं एवढं मोठं आणि आपुलकीने स्वागत भोर मतदारसंघातील लोकांनी केलं. लोकांनी खूप प्रेम दिलं. माता भगिनींची परिस्थिती बदलायची आहे. ऊन-पावसात चालत जावं लागतं, क्रीडा संकुल देखील मुलांना उपलब्ध नाही. पिरंगुट एमआयडीसीतुन एवढ्या कंपन्या निघून चालल्या आहेत. ग्रामीण भागात रस्ते, लाईट नाही. आपण मतदान कशासाठी करतो? रस्ते चांगले झाले पाहिजे, लाईट आली पाहिजे, शिक्षण, आरोग्य भेटलं पाहिजे. आपण यासाठी मतदान करतो ना, मग आपण मतदान करून ४० वर्षात काय भेटलंय? त्यामुळे तुमचे आशीर्वाद फक्त सोबत राहुद्या.

Hतोरणा-राजगड वर शिवसृष्टी झाली पाहिजे, रायरेश्वराला जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र बनवायचे आहे. महामार्ग व रस्ते चांगले बनवायचे आहेत. आयटी पार्कमध्ये स्थानिकांना नोकरी भेटत नाहीये, मुळशीतल्या क्रीडा संकुलाची काय अवस्था आहे, हे पहा. तालुक्यात सध्या गुंडगिरी चालू आहे. २४ तारखेनंतर एकही गुंड दिसणार नाही, एवढं काम करणार. आपलं तालुका म्हणजे लुटायचं ठिकाण झालं आहे, तहसीलला पैसे घेतले जातात, बिनपैशात ती कामं झाली पाहिजे. माझं काम बघा, बावधनमध्ये गार्डन, क्रीडांसकूल बनवलं त्यामध्ये स्विमिंग पूल, स्केटिंग हॉल बॅडमिंटन हॉल, बचत गट हॉल, रस्ता, पाणी प्रश्न मार्गी लावले. असंच काम करण्यासाठी आलोय.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

एक दिवस माझ्यासाठी द्या, पुढील आयुष्यभर मी तुमच्यासाठी काम करेल आणि परिस्थिती बदलून टाकेल. जर काम केलं नाही तर तालुक्यात मला फिरकुही देऊ नका. मी जेजे बोललो ते ते करून दाखवलं आहे. तीन तालुक्यात तीन मंगल कार्यालय बांधून मुलींची लग्न मोफत होतील अशी सोय करणार. मला तुमच्यासाठी कायतरी करायचं आहे.

भ्रमणध्वरीवरून दिग्दर्शक लेखक प्रवीण तरडे म्हणाले
विकास तालुक्यात येतोय, त्याचा मलिदा खायला राजकीय मंडळी सरसावतील. त्यापेक्षा किरण दगडे पाटील हा इमानदार माणूस आहे, तो चांगला आहे. त्यामुळे मी प्रवीण विठ्ठल तरडे तुम्हाला विनंती करतोय, किरण दगडे पाटील यांना निवडून द्या, तोच सगळ्यात चांगला पर्याय आहे. मतदारसंघात श्रावणबाळ ओळखले जाणारा देवदर्शन घडवणारा हा सुपुत्र आपल्या तालुक्यातला आहे, याचा किती अभिमान आहे. ४० वर्षात तालुक्यातील लोकांनी जमिनी विकुनच खाल्ल्या, तालुक्यात विकास आला पण त्या विकासात तालुका आहे का कुठं अस म्हणत एका अपक्ष उमेदवाराने सगळ्यांच्या झोपा उडवल्या आहेत, असे तरडे म्हणाले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार