बौद्धजन सहकारी संघाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांचे दुःखद निधन

0
1

मुंबई दि. ९ (रामदास धो. गमरे) बौद्धजन सहकारी संघ, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी, मुंबई विभाग या विभागाचे तरुण तडफदार, ध्येयवादी, मनमिळाऊ, सर्वसमावेशक, खंबीर नेतृत्व असलेले सहकारी संघाचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पांडुरंग जाधव मुक्काम गाव डोडवली, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी यांचे दीर्घ आजाराने दि. ९ जून २०२५ रोजी वयाच्या ५० व्या वर्षी विक्रोळी पार्कसाईड दुःखद निधन झाले.

दिवंगत राजेंद्र जाधव यांनी संघाचा कारभार हाती घेतल्या त्यावेळी एक नवीन ऊर्जा, नवचैतन्य संघात निर्माण झाले होते, त्यांनी अत्यंत काटेकोरपणे सर्व कामांची हाताळणी करत अत्यंत वेगाने व आत्मविश्वासाने कामांना गती दिली, जवळपास निष्क्रिय झालेल्या विभाग क्र. ७ येथे विभाग अध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांनी आपल्या कामाच्या झंझावाताने विभागाचा कायापालट केला, त्यांची कार्यपद्धती पाहून सर्वांनुमते तालुका अध्यक्ष पदाची धुरा त्यांच्याकडे सोपविण्यात आली व ती धुरा ही प्रामाणिक व यशस्वीपणे पेलवत असतानाच त्यांना अचानकपणे नैसर्गिकरित्या आजार बळावला, उपचाराकरिता त्यांना केईएम रुग्णालय मुंबई येत भरती करण्यात आले होते त्यानंतर ते वर्षभर घरी जागेवरच होते.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

दिवंगत राजेंद्र पांडुरंग जाधव हे मनमिळाऊ, प्रेमळ, सर्वसमावेशक, नेतृत्ववान, क्रियाशील कार्यकर्ते असून संघाच्या दैदिप्यमान वाटचालीस त्यांनी अमूल्य योगदान दिले होते असे झंझावती वादळ आज अचानक शांत झाल्याने संघाच्या मुंबई मध्यवर्ती कमिटीला मोठा धक्का बसला असून त्यांच्या जाण्याने संघाची कधी न भरून निघणारी मोठी हानी झाली आहे तसेच त्यांच्या निधनाने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे अशी भावना मध्यवर्ती कमिटीच्या वतीने व्यक्त होत आहे. असा तरुण तडफदार कार्यकर्ता आपल्यातून निघून गेल्याने गाव मुंबई शाखेत, तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यांच्या पवित्र स्मृतीस बौद्धजन सहकारी संघ गाव मुंबई शाखा, आजी माजी विश्वस्त मंडळ, विभाग अधिकारी, संघाच्या पोटसमित्या, तालुक्यातील ६८ गावांच्या कार्यकारिणी मंडळ, सभासद, सदस्य, महिला मंडळ आदी सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यांची अंत्ययात्रा आज संध्याकाळी ठीक ५:०० वाजता त्यांच्या राहत्या घरून वर्षा नगर, पाण्याची टाकी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे, पार्क साईड, विक्रोळी, मुंबई येथून निघणार असून सदर अंत्ययात्रेस तालुक्यातील सर्वच मान्यवर सभासदांनी उपस्थित राहून स्मृतिशेष राजेंद्र पांडुरंग जाधव यांना अंतिम मानवंदना द्यावी अशी विनंती मुंबई विभाग चेअरमन दीपक मोहिते व चिटणीस संदेश गमरे यांनी संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात केली आहे.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ