“इतिहासकारांनी शंभूचरित्रावर प्रचंड अन्याय केलाय,तो धुवून काढायचं काम नव्या पिढीला करावं लागेल:प्राध्यापक यशवंत गोसावी

0
1

“इतिहासकारांनी शंभूचरित्रावर प्रचंड अन्याय केलाय,तो धुवून काढायचं काम नव्या पिढीला करावं लागेल. छत्रपती संभाजी महाराज हे असामान्य योद्धा होतेच,परंतु त्यासोबतच धर्मपंडित, न्यायी आणि कित्येक भाषांचे जानकार सुद्धा होते. त्याचं हे रूप देखील अधिक प्रभावीपणे समाजासमोर येणं गरजेचं आहे” असे प्रतिपादन प्रसिध्द शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी मोरया मित्र मंडळ छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात केलं.

मोरया मित्र मंडळ कर्वेनगर यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष आनंद तांबे, यशवंत गोसावी,रेश्मा बराटे यांच्या हस्ते पुजा करुन पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी शिवकालीन ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर सुप्रसिद्ध युवा शिवशंभू व्याख्याते प्राध्यापक यशवंत गोसावी सर यांचे व्याख्यान झाले. व्याख्यानानंतर दरवर्षी मोरया मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती निमित्त पुरस्कार प्रदान केले जातात. यावर्षी २०२५ मोरया रत्न वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत नागरीकांन साठी मोफत आरोग्य शिबीरे राबवुन, वैद्यकीय मार्गदर्शन खुप वर्षे करत आहात .तसेच शालेय विद्यार्थ्यांना सहकार्य तसेच शालेय वस्तू, वह्या पुस्तके कोणतीही जाहिरात प्रसिद्धी न करता, नाव गुपीत ठेवून, सामाजिक बांधिलकी जपत आहे असे डॉ गिरीश अच्युत कामत याना मोरया रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गेली 25 वर्षे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत, महिलांच्या हक्कांसाठी तसेच महिला सक्षमीकरण करण्यासाठी संपूर्ण वेळ काम करत असणाऱ्या तसेच विद्यार्थ्यांना सहकार्य, तृतीय पंथी, अनाथ आश्रमांसाठी विविध कार्यक्रम करत ,समाजातील महिलांसाठी शैक्षणिक, आरोग्य, आणि सक्षमीकरण करण्यासाठी केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. हि कामगिरी अशीच सुरू राहवो म्हणून मोरया मित्र मंडळ कर्वेनगर यांच्या वतीने छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती निमित्त संस्थापक अध्यक्ष स्वप्नल फाउंडेशन,राष्ट्रीय उपाध्यक्ष,अखिल भारतीय भष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समिती. ब्रिक्स ह्युमन राईट शोभा चंद्रकांत बल्लाळ यांना,मोरया जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मोरया भूषण पुरस्कार विजय शिवाजीराव नायकल यांना देण्यात आला.
त्यानंतर मोरया मित्र मंडळाच्या वतीने संभाजी महाराज जयंती निमित्त राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, शिवकालीन ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्या स्पर्धाचा पारितोषिक वितरण समारंभ खारवडे श्री म्हसोबा देवस्थान ट्रस्ट अध्यक्षा सौ मधुराताई मुकुंद भेलके, यशवंत गोसावी, सामाजिक कार्यकर्ते विरेश शितोळे, अनिकेत जावळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
चित्र कला स्पर्धा
प्रथम क्रमांक नेत्रा नवनाथ नायकवडी
द्वितीय चैत्राली विनायक शिंदे
तृतीय क्रमांक कृष्णा रंभु शर्मा
उत्तेजनार्थ
कृतीका शिवाजी जाधव
चित्र रंगवणे स्पर्धा
प्रथम क्रमांक
आराध्य सोमनाथ लांडे
द्वितीय क्रमांक
अनमोल हुंदळेकर
तृतीय क्रमांक
सिया गणेश चव्हाण
चतृर्थ क्रमांक
तेजूल शरद पवार
उत्तेजनार्थ
विठ्ठल मच्छिंद्र खूपसे
हर्षिता उमेश शिंदे
कार्तिक नितीन पाटील
राज्यस्तरीय ऑनलाईन वत्कृत्व स्पर्धा १४ वर्षांखालील
प्रथम क्रमांक
काव्या सोमनाथ लांडे (वय ११)
द्वितीय क्रमांकः शिवराज प्रमोद चव्हाण (छत्रपती संभाजी नगर)
तृतीय क्रमांकः अनमोल जितेंद्र हुंदळेकर
उत्तेजनार्थ
गौरवी संदिप राऊत
आद्या सातारकर
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा खुला गट
प्रथम क्रमांक
सोहम वागस्कर (अहिल्या नगर)
द्वितीय क्रमांक
दिशा सपकाळ
तृतीय क्रमांक
सिद्धी चिव्हे
उत्तेजनार्थ :कोमल शिंदे
यावेळी मैत्री प्रतिष्ठान अध्यक्ष विजय खळदकर, राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस विष्णुपंत सरगर, गजानन कड, अशोक कदम, आनंद पाटील, ललित दांगट, सचिन धनकुडे, प्रकाश शिंदे, महेश पवळे, मयुर बनकर उस्तवप्रमुख ऋषिकेश जगताप, मंडळाचे अध्यक्ष रोहिदास जाधव, उपाध्यक्ष रोहित दानवले, आणि मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक बाळकृष्ण नेहरकर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना केदार मारणे म्हणाले *आम्ही छत्रपती श्री संभाजी महाराजांची जयंती करतो याचं कारण छत्रपती संभाजी महाराज घराघरापर्यंत मनामनापर्यंत पोहोचले पाहिजे तसेच छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज यांच्या रक्तगटाचे माणसं तयार झाली पाहिजे म्हणून आमची मागणी आहे संभाजी महाराजांचा इतिहास शालेय पाठ्य पुस्तकात यावा*
आयोजन मंडळाचे संस्थापक केदार आशा वसंत मारणे यांनी केले.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे