श्री रामेश्वर पॅनेलच्या 90% मतदार भेटी पूर्ण; 32 वर्षाचा विश्वासहार्य पारदर्शी कारभाराच ‘विजयी’चा दृढविश्वास!

0
1

श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. विद्यमान संचालक मंडळाच्या वतीने निवडणूक 2024-25 / 2029-30 लढवणाऱ्या श्री रामेश्वर पॅनल च्या प्रचाराचा शुभारंभ ते समारोप असा भरगच्च कार्यक्रम उत्साही प्रतिसादात पूर्ण झाला त्यातच व्यक्तिगत गाठीभेटीमुळे पतसंस्थेच्या सुमारे 90% मतदारांच्या गाठीभेटी पूर्ण झाल्या असून 32 वर्षाच्या पारदर्शी विश्वासहार्य कारभारामुळे झालेले उत्साही स्वागत पुन्हा सभासदांच्या पसंतीस उतरून पुन्हा विजयी करेल असा दृढ विश्वास संचालक मंडळ व  सर्व उमेदवारांना वाटत आहे. मतदान हे लोकशाहीचे पवित्र कार्य असून सर्व मतदारांनी उद्या आवश्यक मतदान करावे असे आवाहनही समारोपाच्या वेळी करण्यात आले.

श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्था परिसरातील एक प्रतिष्ठित आणि दैदिप्यमान संस्था आहे. संस्थेने विश्वासार्ह कारभार आणि निस्वार्थी संचालकांच्या सहकार्याने आजपर्यंत मोठी वाटचाल पार पाडली आहे. सभासदांच्या हितार्थ यंदाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अतोनात प्रयत्न झाले परंतु काही मंडळींनी स्व:हिताला किंमत दिल्यामुळे सभासदांवर ही निवडणूक लादण्यात आल्याची जाणीव सर्व सभासदांना असल्याने मागील 32 वर्षाच्या कार्यभार पाहून आगामी निवडणुकीमध्ये सभासदांची पहिली पसंती ठरली असून रविवार दि. २७ एप्रिल २०२५ रोजी यावरती अधिकृत शिक्कामोर्तब होऊन सहकाराला कीड लावणाऱ्या लोकांचा पक्का बंदोबस्त होईल असा विश्वासही संचालक मंडळांना वाटत आहे. श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्था विद्यमान अध्यक्ष,उपाध्यक्ष, पदाधिकारी,आजी-माजी संचालक, संस्थेचे हितचिंतक, भाग भांडवलदार आणि मतदार मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी झाले होते.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

श्री रामेश्वर पॅनेल तर्फे –

अनु क्रमांक १      दांगट सचिन दशरथ        सर्वसाधारण

अनु क्रमांक २    दांगट विकास पंढरीनाथ       सर्वसाधारण

अनु क्रमांक ४     घुले अभिजित सोपान       सर्वसाधारण

अनु क्रमांक ५    घुले बाळासाहेब काळुराम     सर्वसाधारण

अनु क्रमांक ७   हगवणे बाळासाहेब अर्जुनराव सर्वसाधारण

अनु क्रमांक ८    हगवणे राजेंद्र गणपत        सर्वसाधारण

अनु क्रमांक १०  लगड देवीदास एकनाथ    सर्वसाधारण

अनु क्रमांक ११    मते विलास साधू            सर्वसाधारण

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

अनु क्रमांक १     देवकर राजेश शंकर

(विमुक्त जाती / भटक्या जमाती /विशेष मागास प्रवर्ग)

या सर्व उमेदवार नशीब आजमावत असून भरघोस मतांनी विश्वासही प्रचाराच्या दरम्यान जाणवला असल्याचे उमेदवारांनी सांगितले. श्री रामेश्वर पॅनल तर्फे बिनविरोध निवडून आलेल्या सौ. विनादेवी विजय मते, सौ. मनीषा भगवान मोरे, श्री, विकास रामदास कोल्हे, श्री. नागेश सोपान शिंदे  यांनीही व्यक्तिगत गाठीभेटी घेत अन्य उमेदवारांसाठी प्रचाराची धुरा अत्यंत धडाडीने सांभाळल्याने रविवार दि. २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ५ वाजेपर्यंत गणेश मंगल कार्यालय, नांदेड फाटा, पुणे – ४१ येथे उत्साही मतदान पार पडण्याची आशा यावेळी सर्वांनी व्यक्त केली.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले