अंबादास दानवेंची ‘आमदारकी’ काहीच दिवस बाकी; विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसचा डोळा?

0

विधानसभा विरोधी पक्ष नेते पदासाठी भास्कर जाधव यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. याबाबतचे पत्र अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र सद्यस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे 20 आमदार असून विरोधी पक्ष नेतेपदासाठी आवश्यक 29 आमदारांची अट पूर्ण होत नाही.

त्यामुळे यावेळी एखाद्या पक्षाला विरोधी पक्ष नेते पद द्यायचे का? याबाबत राहुल नार्वेकर यांना विशेषाधिकारातून निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे या पत्रानंतरही विधानसभा अध्यक्ष कार्यालयाची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे. विरोधी पक्ष नेते पदाचा निर्णय घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भूमिका तितकीच महत्वाची असणार आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

त्याचवेळी विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदावर काँग्रेस दावा करणार असल्याची माहिती एका ज्येष्ठ काँग्रेसने नेत्याने दिली आहे. काँग्रेसला जनतेचा पक्ष म्हणून पुढे यायचे आहे. याच भूमिकेचा भाग म्हणून एका सभागृहाचे विरोधी पक्ष नेते पद आपल्याकडे ठेवून राज्यात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न काँग्रेसचा असणार आहे.

विद्यमान विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या सदस्यत्वाचा कालावधी लवकरच संपत आहे. 29 ऑगस्ट 2025 रोजी त्यांच्या आमदारकीची मुदत संपुष्टात येत आहे. ते छत्रपती संभाजीनगरच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रलंबित असल्याने पुन्हा निवडून येण्यासाठी त्यांना वाट पहावी लागणार आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

त्यामुळे आत्ताच या संदर्भात घाई करावी की ? आता घाई न करता पावसाळी अधिवेशनापर्यंत थांबावे का? अशीही चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात ऐकावयास मिळत आहे. यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका आणि मध्यस्थी देखील महत्त्वाची मानली जात आहे.