पुण्यात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली असून आज २२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आज एकूण ५९ नवीन रुग्ण आढळले असून, पुणे जिल्ह्यातील आकडा सर्वाधिक आहे.






सर्वाधिक चिंता वाढवणारी बाब म्हणजे आज मिरज येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला असून राज्यातील एकूण मृतांचा आकडा आता ३२ वर पोहोचला आहे.
महाराष्ट्रातील एकूण ३८९ रुग्ण सध्या सक्रिय असून सर्वांमध्ये सौम्य लक्षणे आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. मुंबईत सर्वाधिक एकूण ९१२ रुग्णांची नोंद आहे (सक्रिय व बरे झालेल्यांसह).
३२ मृत्यूंपैकी ३१ रुग्ण हे इतर गंभीर आजारांनी ग्रस्त होते, तर एका रुग्णाची माहिती अजून अस्पष्ट आहे, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील रुग्णसंख्या (आज):
- पुणे: 22
- मुंबई: 13
- चंद्रपूर: 10
- कोल्हापूर: 6
- सातारा: 2
- सांगली: 2
- नागपूर: 2
- नवी मुंबई: 1
- पनवेल: 1
आरोग्य विभागाने इशारा दिला आहे की केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे, त्यामुळे नागरिकांनी पूर्वीप्रमाणेच सतर्कता व काळजी घेणे गरजेचे आहे.
महत्वाच्या सूचना:
- गर्दीपासून दूर राहा
- मास्कचा वापर सुरू ठेवा
- लक्षणे आढळल्यास तात्काळ चाचणी करून घ्या
- वृद्ध व व्याधीग्रस्तांनी विशेष काळजी घ्यावी










