आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारीतील लाखो वारकऱ्यांच्या आरोग्यसुरक्षेसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने व्यापक उपाययोजना केल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी आंबिटकर यांनी दिली.
त्यांच्या निर्देशानुसार, एकही वारकरी वैद्यकीय सेवांपासून वंचित राहू नये यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, पाण्याद्वारे व कीटकजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.
प्रमुख आरोग्य सेवा व सुविधा:
- प्रत्येक ५ किमी अंतरावर ‘आपला दवाखाना’ उभारण्यात येणार
- २०२, १०२ व १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका २४x७ सज्ज
- ३३१ वैद्यकीय किट दिंडी प्रमुखांना वितरित
- ३,५०० स्त्रीरोगतज्ज्ञ सेवा महिला वारकऱ्यांसाठी उपलब्ध
- १५ ‘हिरकणी रूम्स’ विश्रांती ठिकाणी महिला व लहान मुलांसाठी
- ३७ आरोग्य राजदूत मोटारसायकलवर सज्ज – आरोग्य माहिती आणि तत्काळ मदत
- २९० फिरते माहिती व शिक्षण वाहने वारीत सहभागी
- १ अतिदक्षता युनिट (ICU) तैनात
- ४५ हेल्थ मॉनिटरिंग व्हेइकल्स – हॉटेल्स, पाणी व अन्न तपासणीसाठी कार्यरत
रोग प्रतिबंधक उपाय:
- वारी मार्गावरील सर्व पाणवठ्यांचे सर्वेक्षण व जलगुणवत्ता तपासणी
- रस्त्यालगतच्या खाद्यपदार्थांची तपासणी
- मच्छर निर्मूलनासाठी कंटेनर स्वच्छता, साचलेले पाणी काढणे
- स्थानिक ग्रामपंचायती व गटविकास अधिकाऱ्यांशी समन्वय साधून स्वच्छता मोहिमा
जनजागृतीसाठी विशेष मोहिम:
- टी-शर्ट, टोपी, शाल, रुग्णवाहिका व टँकरवर आरोग्यविषयक संदेश
- सेवा केंद्रांवर छत्री स्टँड व तात्पुरत्या निवाऱ्यांवर आरोग्य संदेश
- आरोग्य केंद्रांमार्फत प्रदर्शने व माहिती फलक
- ३x५ फूट बॅनर – आरोग्य योजना व प्रतिबंधात्मक उपायांच्या माहितीने सज्ज
आरोग्यमंत्री आंबिटकर म्हणाले, “वारी ही केवळ अध्यात्मिक नाही, तर आरोग्यदृष्ट्याही सुरक्षित ठरावी, यासाठी राज्य शासनाने संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज केली आहे.”