धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणाला वेग आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोर वाढत असताना झालेली भेट नक्की कशासाठी झाली? असा प्रश्न विरोधकांना पडलाय. तब्येत बरी नसल्याने ही भेट घेतल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं असलं तरी डोळ्यांचा ऑपरेशन हे नॉर्मल असतं काही सिरीयस होतं का? त्यावेळेस जाऊन भेटायला मंत्रिमंडळातील कोणीच गेले हे कशाला.. कुछ तो गडबड.. है काहीतरी साध्य करण्यासाठीच धस गेले असतील. धस आणि मुंडे भेटीवर संशय निर्माण होत आहे असं विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी या भेटीवर तिरकस टीका केली आहे.






ते धस स्वतःच्या प्रदेशाध्यक्ष संदर्भात प्रश्न निर्माण करत असतील तर सुरेश धस कोणाच्या इशाऱ्यावर हिम्मत दाखवत आहेत हे बावनकुळेंनीच शोधून काढावं असेही वडेट्टीवार म्हणालेत.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार ?
‘आता ती भेट चार तास झाली, की चार मिनिट झाले पण भेट झाली हे खर आहे..एकमेकांचे पप्पी घेण्यासाठी गेले होते का? डोळ्याच ऑपरेशन हे नॉर्मल असतं. काही सिरीयस होते का? त्यावेळेस जाऊन भेटायला मंत्रिमंडळातील कोणीच गेले नाही. हे कशाला भेटायला गेले. कुछ तो गडबड है. काहीतरी साध्य करण्यासाठी धस गेले असतील… त्यावर संशय निर्माण होत आहे.. ते धस स्वतःच्या प्रदेशाध्यक्ष संदर्भात प्रश्न निर्माण करत असतील तर सुरेश धस कोणाच्या इशाऱ्यावर हिम्मत दाखवत आहे ते बावनकुळे यांनी शोधून काढावं. सध्या प्रचंड बहुमत आहे. पण हे सरकार असं का वागत आहे. या सरकारमध्ये एक वाक्यता का नाही..तीन मुंडीचा सरकार तीन दिशेला का बघत आहे… यांच्या आपसात कुरघोड्या सुरू आहे… त्यावरच या सरकारचं अधिपतन होईल आणि जनता सरकारला नाकारेल. असे वडेट्टीवार म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचा काही चुकलं नाही गोपनीयतेची शपथ घेत असेल तर त्याला बाहेर जाऊ नये, चॅनलला हेडलाईन दाखवण्यासाठी तुम्ही सोर्स वापरता त्याला एखादा कॅबिनेट मंत्री बळी पडतो. प्रत्येक मुख्यमंत्री या सूचना देत असतात. मंत्रिमंडळात फितूर आहे का देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून फितूर याचा शोध घेण्यासाठी विरोधकांचा आवश्यकता असेल तर आहे त्यांना मदत करू ते जर आम्हाला मागणी करतील तर आम्ही त्यांना नाव देऊ. असंही ते म्हणाले.











