‘हा’ प्रसिद्ध युट्यूबर वादाच्या भोवऱ्यात, त्याच्यावर पुन्हा FIR दाखल करण्याचे आदेश, नक्की काय आहे प्रकरण?

0
1

प्रसिद्ध आणि लोकप्रिय युट्यूबरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण युट्यूबरवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या जो युट्यूबर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून ‘बिग बॉस ओटीटी’ फेम एल्विश यादव आहे. साप तस्करी प्रकरणात नाव आल्यानंतर प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादवच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.आता एल्विश यादवविरोधात आणखी एक एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जुन्या खटल्यातील एका साक्षीदाराने गाझियाबाद कोर्टात धमकावल्याचा आरोप केला आहे. कोर्टाने प्रकरणाचा पूर्ण तपास करण्याची जबाबदारी नांदग्राम पोलिस स्थानकावर सोपावली आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

सांगायचं झालं तर, एल्विश यादववर सापाच्या विषाची तस्करी केल्याचा आरोप होता. नोएडा पोलिसांनी सापांची तस्करी करणाऱ्या टोळीला पकडलं होतं. पोलिसांच्या चौकशीत या टोळीतील सदस्यांनी प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादव याच्याशीही संबंध असल्याचे सांगितले होते.याचप्रकरणी नोएडा पोलिसांन एल्विश याला अटक केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. आता याच प्रकरणात गाझियाबाद येथील रहिवासी असलेल्या सौरभ गुप्ता या साक्षीदाराने गाझियाबाद न्यायालयात अर्ज दाखल केला आहे की, त्याला घाबरवलं जात आहे, धमकावले जात आहे आणि शिवाय तो राहत असलेल्या परिसराची रेकी देखील करण्यात येत आहे.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

सौरभ गुप्ता यांनी न्यायालयात हे आरोप केले असता न्यायालयाने सौरभ गुप्ता यांना विचारले की, तुम्ही न्यायालयात का येत आहात आणि तुम्हाला धमक्या दिल्या जात असतील तर पोलिसात तक्रार करा. यावर सौरभ गुप्ता यांनी कागदपत्रे सादर करत नंदग्राम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, मात्र पोलीस ठाण्यात कोणतीही सुनावणी झाली नसल्याचे न्यायालयाला सांगितले.

सौरभ गुप्ता यांना सोशल मीडियावरून देखील धमकावलं जात आहे. माझ्या जीवाला धोका आहे… असं देखील सौरभ गुप्ता यांचं म्हणणं आहे. सतत धमक्या मिळत असल्यामुळे सौरभ गुप्ता यांनी फेसबूक आकाउंट देखील बंद केलं आहे. या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने आता नंदग्राम पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती