छावा चित्रपटाला विरोध, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची पहिली प्रतिक्रिया; “तज्ज्ञांना दाखवूनच…”

0

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित छावा चित्रपटासमोर विघ्न आलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा चित्रपटाला विरोध केला जात आहे. शिवप्रेमींनी या चित्रपटातील काही दृष्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. छावा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, यावरुन वादाला तोंड फुटलं आहे. टिझरमध्ये काही चुकीचे दृष्य दाखवल्याचा आरोप शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे. यावर आता चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लक्ष्मण उतेकर यांची पहिली प्रतिक्रिया

विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या छावा चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी लक्ष्मण उतेकर यांच्या खांद्यावर आहे. विविध स्तरांतून छावा चित्रपटाला होत असलेला विरोध पाहता दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. छावा चित्रपट तज्ज्ञांना दाखवूनच त्यानंतरच प्रदर्शित करणार, अशी भूमिका चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिली आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

छावा चित्रपटाच्या वादावर दिग्दर्शक काय म्हणाले?

छावा चित्रपटाच्या ट्रेलरमधील छत्रपती संभाजी महाराज आणि येसूबाई नाचताला दाखवलेल्या दृष्यावर शिवप्रेमींना आक्षेप घेतला आहे. यानंतर मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करत सरकारची भूमिका मांडली. छावा चित्रपट तज्ज्ञ आणि इतिहास जाणकारांना दाखवा आणि त्यानंतरच तो प्रदर्शित करा, असं म्हटलं. यानंतर दिग्दर्शक यांनी म्हटलं आहे की, छावा चित्रपट इतिहास जाणकार आणि तज्ज्ञांना दाखवून त्यानंतरच चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येईल, असं म्हणतच स्पष्टीकरण दिलं आहे.

उदय सामंतांनी ट्वीटमध्ये काय म्हटलंय?

उदय सामंतांनी एक्स मीडियावर पोस्टमध्ये लिहिलंय की, ” हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा त्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी आमची भूमिका आहे. महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही”.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा