देशमुख हत्या प्रकरणातील न्यायाधीशांची निलंबित अन् रजेवर पाठवलेल्या पोलिसांसोबत धुळवड?

0
1

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी याच प्रकरणात निलंबित आणि रजेवर पाठवलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत धुळवडीचा आनंद लुटल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी काही फोटो ‘एक्स’वर शेअर केले आहेत. दमानियांच्या दाव्याने देशमुख यांच्या हत्येच्या सुनावणीवर संशय व्यक्त केला जात आहे.

‘एक्स’वर पोस्ट करत अंजली दमानिया म्हणाल्या, “संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील व याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे धुळवडीला रंगाची उधळण करुन आनंद साजरा करताना दिसत आहेत. पण कोणाबरोबर? संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावणी करणारे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्यासोबत रंगाची उधळण करताना दिसत आहेत.”

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

“आता यांचे जर आरोपीला वाचणारे हे निलंबित आधिकाऱ्यांसोबत केस चालू असताना, न्यायाधीश होळी खेळत असतील, तर हे खूप चुकीचे आहे,” असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.