अगोदर कोट्यवधीचे व्यवहार नंतर बॅकडेटेड बनावट दस्त बनवून फसवणूक; दीपक मानकरांसह तिघांविरुद्ध गुन्हा

0

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह तिघांविरुद्ध बनावट दस्त करुन फसवणूक केल्याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक व्यवहार लपविण्यासाठी बनावट दस्त केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले होते. रौनक भरत जैन (वय-३८, रा. सूर्यप्रकाश अपार्टमेंट, मार्केट यार्ड ) दीपक माधवराव मानकर (वय ६७, रा. जलसा सोसायटी, विधी महाविद्यालय रस्ता), शंतून सॅम्युअल कुकडे (वय-५३, रा.तिरुपती अपार्टमेंट, नाना पेठ ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दरम्यान, कुकडे याचा निकटवर्तीय रौनक जैन याच्या खात्यातून दीपक मानकर व त्यांच्या मुलाच्या बॅंक खात्यात पावणे दोन कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले होते. तसेच कुकडे याच्या खात्यात देखील कोट्यवधी रुपये असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्यादृष्टीने तपास केला. संबंधित रक्कम ४० ते ५० जणांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली होती.

अधिक वाचा  अजितदादांची ही खेळी पुणेरी राजकारणात मोठी उलथापालथ; 3 पक्षात वादाचा भडका आणि भाजपाची ही गणिते बिघडली आत्ता दुरंगी लढती शक्य

दरम्यान, जैन, मानकर, कुकडे यांनी आर्थिक व्यवहार लपविण्यासाठी बनावट दस्त तयार केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले. बनावट दस्त सादर करुन फसवणूक केल्याप्रकरणी जैन, कुकडे व मानकर या तिघांविरुद्ध फसवणूक, तसेच बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, परदेशी तरुणीला आश्रय देण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात शंतनू कुकडे याच्यासह आठ जणांविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात आठ जणांना अटकही झालेली आहे.

अधिक वाचा  भाजपच्या पुणे ‘सर्जिकल स्ट्राईक’ नंतर कोअर कमिटीत 100 नावांवर एकमत ; आधी आपला बाब्या अन् नंतर….?

‘जैन व आमच्यात झालेल्या व्यावसायाची विसार पावती आमच्याकडे आहे. सर्व काही कायदेशीर असताना गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे या प्रकाराविरुद्ध आम्हीही कायदेशीर लढा देणार आहोत.’

– दीपक मानकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष.