WTC 2025 Final साठी ऑस्ट्रेलिया टीम जाहीर, कर्णधार कोण?

0

क्रिकेट विश्वातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 फायनलसाठी टीम जाहीर केली आहे. क्रिकेट बोर्डाने मुख्य संघात 15 खेळाडूंची निवड केली आहे. तर ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह म्हणून एका खेळाडूला संधी दिली आहे. पॅट कमिन्स या महाअंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. तर अनुभवी स्टीव्हन स्मिथ याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा आहे. आयसीसी आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. ऑस्ट्रेलियासमोर या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मॅट कुह्नेमन, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा