गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात आयएएस अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आहे. सध्या त्यांच्यावर रोज नवनवे आरोप होत असल्याने दिवसेंदिवस त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आजच त्यांचा तपासा अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता.
पूजा खेडकर यांच्यावर होत असलेल्या आरोपांची चौकशी देखील सुरु करण्यात आली आहे. तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार पूजा खेडकर यांना ट्रेनिंग होल्ड करण्याचे आदेश नितीन गद्रे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी दिले आहे.