ग्रामीण भागात भाजीपाल्याचे दर घसरले, ग्राहकांना दिलासा, तर शेतकरी चिंतेत

0

मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आठवडी बाजारात भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. ग्राहकाला यामुळे दिलासा मिळाला आहे. त्याच्या रोजच्या खर्चात थोडी बचत झाली आहे. तर दुसरीकडे भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. टोमॅटो 5 तर वांगे 10 रुपये किलोने विकत असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांचा वाहतुकीचा ही खर्च निघत नसल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक शेतकर्‍यांनी टोमॅटो आणि वांगे रस्त्यावर फेकून दिल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय इतर भाजीपाल्यांचे ही दर कमी झाल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला. बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने सद्यस्थितीला कमी दर असल्याचं सांगण्यात येत आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आठवडी बाजारात भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. ग्राहकाला यामुळे दिलासा मिळाला आहे. त्याच्या रोजच्या खर्चात थोडी बचत झाली आहे. तर दुसरीकडे भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. टोमॅटो 5 तर वांगे 10 रुपये किलोने विकत असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांचा वाहतुकीचा ही खर्च निघत नसल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक शेतकर्‍यांनी टोमॅटो आणि वांगे रस्त्यावर फेकून दिल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय इतर भाजीपाल्यांचे ही दर कमी झाल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला. बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने सद्यस्थितीला कमी दर असल्याचं सांगण्यात येत आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

रब्बीचे पीक बहरणार

गेल्या पंधरवड्यापासून गायब असलेली थंडी अचानक वाढल्यामुळे धुळे जिल्ह्यातल्या रब्बी पिकांना त्याचा फायदा होणार आहे. तापमानाचा पारा हा 8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे कमी झालेल्या तापमानाचा फायदा गहू, हरभरा आणि अन्य पिकांच्या वाढीला होणार आहे. थंडीचा कडाका असाच कायम राहिला तर येणार उत्पन्नही चांगले राहील अशी आशा शेतकर्‍यांना आहे.

पालेभाज्यांना कवडीमोल भाव

कोथिंबीर -2 ते 8 रुपये

मेथी – 4 ते 7 रुपये

शेपू – 3 ते 7 रुपये

पुदिना – 3 रुपये

पालक 3 ते 7 रुपये

कांदापात 5 ते 10 रुपये

करडई – 3 ते 6 रुपये.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

चवळई – 6 ते 10 रुपये