राज्यात लक्षवेधी निवडणुकीपैकी असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे भवितव्य ठरवणारी आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणुकीला समोरे जाताना खासदार डॉ. श्रीकांत यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली. गेल्या पाच वर्षात त्यांची संपत्ती सर्वसामान्यांचे डोळे विस्फारतील एवढी वाढल्याचे दिसते. श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केल्यानुसार त्यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात तब्बल 669 टक्के वाढ झाली. मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व उमेदवारांमध्ये ही सर्वाधिक वाढ आहे.






श्रीकांत शिंदे यांनी 2014 मध्ये संपत्ती घोषित केली होती. त्यानुसार त्यांची संपत्ती 15 कोटी रुपये होती. इन्फॉम्ई व्होटर प्रोजेक्टच्या अभ्यास अहवाल तसे सांगतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संपत्तीत झालेल्या वाढीचा आकड़ा डोळे विस्फरणारा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्या गटाच्या विद्यमान खासदार आणि उमेदवारांपैकी सर्वाधिक संपत्ती ही श्रीकांत शिंदे यांची आहे. 2019 च्या निवडणुकीनंतर शिदिच्या संपत्ती वाढतच गेली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या खासदारांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसते. शिंदे गटाच्या खासदारांची संपत्ती 339 टक्केने वाढली असून, उमेदवारांची सरासरी संपत्ती 24.1 कोटी रुपये आहे.श्रीकांत शिंदे यांची सध्या संपत्ती 14 कोटी 93लाख असून, या संपत्तीत गेल्या पाच वर्षात 669 टक्के वाढ झाली आहे.
श्रीकांत शिंदे यांच्या संपत्तीतील वाढ ही 2019 च्या तुलनेत 13 कोटींची आहे. पाच वर्षापूर्वी म्हणजेच, 2019 मध्ये श्रीकांत शिंदे यांची मालमत्ता 1 कोटी 67 लाख 59 हजार 515 रुपये एवढी होती. तसेच श्रीकांत शिंदे यांच्या पत्नीच्या नावावर स्थावर आणि जंगम, अशी एकूण 14 कोटी 43 लाख 80 हजार 790 रुपये आहे. श्रीकांत शिंदे यांच्या खालोखाल शिवसेना एकनाथ शिंदे गटातील मुंबई दक्षिण मध्यचे खासदार राहुल शेवाळे यांच्या संपत्तीत देखील पाच वर्षात वाढ झाली असून, ते शिंदे गटातील सर्वाधिक संपत्ती असलेले दुसऱ्या क्रमाकांचे खासदार आहेत. शेवाळेची संपत्ती 13 कोटी 43 लाख एवढी आहे. त्यांची संपत्ती 619 टक्क्यांनी वाढली आहे.
कल्याण मतदारसंघातून श्रीकांत शिंदे शिवसेनेच्या तिकीटावर दोनदा निवडून आले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्याशी महायुतीचे उमेदवार खासदार श्रीकांत शिंदे यांची थेट लढत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कल्याण-डोंबिवली हा मतदारसंघ बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यावेळी शिवसेनेत फूट पडली आहे. त्यामुळे श्रीकांत शिंद यांना ही निवडणूक जड जाण्याची चिन्हें आहेत. तशी शक्यता देखील वर्तवली जात आहे.
एकनाथ शिंदे गेल्या 9 वर्षापासून सत्तेत…
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग चार वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले आहेत. 2014 पासून ते राज्याच्या सत्तेत दिसत आहेत. महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केले. शिवसेना-भाजप सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री, नगर विकास आणि गृहमंत्री म्हणून काम केले, शिवसेनेतील बंडानंतर त्यांनी भाजपबरोबर युती केली. भाजपच्या पाठिंब्याने राज्याचे विसावे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिदि आहेत.











