विरोधी पक्ष कमकुवत नाही तरीही पण भाजप एवढं लक्ष्य गाठेल: प्रशांत किशोर यांच पुन्हा खळबळजनक वक्तव्यं

0
1

देशात सध्या राजकीय विरोधक भाजपला तोडीस तोड लढत देत असताना आणि सत्तांतर होण्याच्या गप्पा मारत असताना राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणूक 2024 बाबत अनेक भाकीतं केली आहेत. गेल्या दोन निवडणुकीच्या तुलनेत यंदा विरोधक प्रचंड आक्रमक आहे परंतु भारतीय जनता पक्षाच्या वतीने देण्यात आलेला 400 पारचा ना-याबाबत भारतीय जनता पक्षालाही विश्वास नसताना राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी मात्र एक धक्कादायक वक्तव्य केल्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान नरेंद्र मोदी यांनी आपले प्रचार रणनीतीबद्दल हुकूमशाही ही होणारी टीका टाळण्यासाठी अचानक सर्व प्रसार माध्यमांना सुरू केलेल्या मुलाखती आणि प्रचाराचा स्थानिक पातळीवर जोर या बदलामुळे देशातील वातावरण काहीसं बदलत असल्याचं मतही व्यक्त केले. या बदलाच्या जोरावरतीच बंगाल, ओदिशा, तेलंगणा, तामिळनाडू आणि आंध्र या राज्यांमध्ये भाजपला फायदा होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. बंगाल, ओदिशा, तेलंगणा, तामिळनाडू आणि आंध्र या राज्यांमध्ये पक्षाच्या जागा वाढू शकतात, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे. भाजपला जवळपास 300 जागा मिळू शकतात, असंही ते म्हणाले आहेत.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

प्रशांत किशोर यांनी Rटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “भाजपच्या कामगिरीबद्दल अनेक टिप्पण्या आणि वादविवाद सुरू असले तरी उत्तर आणि पश्चिमेतील भाजपच्या जागांमध्ये कोणतीही अर्थपूर्ण घट झाल्याचं मला दिसत नाही.” जनसुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी यावेळी विरोधक मजबूत असल्याचंही वक्तव्य केलं आहे. मात्र, त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला विजयाचा दावेदार म्हणून संबोधलं आहे. भाजपचा प्रभाव असलेल्या उत्तर भारतामध्ये सध्या विरोधकांच्या वतीने रानं उठवले जात असले तरीसुद्धा पश्चिम बंगाल, ओडीशा, तेलंगणा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये भाजपला पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळतील, असंही ते म्हणाले आहेत.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

या लोकसभा निवडणुकीतील एनडीए आघाडीच्या कामगिरीबाबत प्रशांत किशोर म्हणाले की, एनडीएनं 400 जागा जिंकल्याचा भाजपचा दावा योग्य ठरलेला दिसत नाही. प्रशांत किशोर म्हणाले की, यंदाच्या निवडणुकीत विरोधी पक्ष कमकुवत नाही. पण, भाजपच्या विरोधात थेट निवडणूक लढणारे पक्ष कमकुवत दिसू शकतात. विरोधकांची मोट बांधत काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याची यश मिळवले असले तरीसुद्धा प्रत्यक्षात लढतीच्या दरम्यानचे चित्र वेगळेच आहे. त्यामुळे 370 जागांचा आकडा ओलांडण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या याआधीच्या वक्तव्यांचा विचार केला, तर प्रशांत किशोर यांनी भाजपच्या जागांचा आकडा याच्याच आसपास असेल असंही म्हटलं आहे.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

भाजपला 400 जागांचा टप्पा गाठता येणार नाही, हे त्रिकालवादी सत्य आहे परंतु विरोधक म्हणतात त्याप्रमाणे 200 जागांच्याही मोठ्या घसरणीचा सामनाही भारतीय जनता पक्षाला करावा लागणार नाही, असा पुनरुच्चारही यावेळी बोलताना प्रशांत किशोर यांनी केला. या सर्व गोष्टीची कल्पना भारतीय जनता पक्षातला असल्यामुळे त्यांनी आपल्या बदलत्या राजनीतीचे संकेत निवडणुकीच्या अगोदरच दिले असून विविध पक्षांना बरोबर घेण्याची ही रणनीती निवडणूक निकालानंतर त्यांच्या कामी येईल असेही यावेळीराजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी सांगितले. प्रशांत किशोर यांनी केवळ तेजस्वी यादव यांच्यावर हल्लाच केला नाही तर कोणते समीकरण उपयोगी पडणार आहे, हेही सांगितलं आहे.