असं करू नका पाप लागेल; सेलिब्रिटींरील हल्ला अन् धमक्यांबद्दल अभिनेत्याचा थेट हल्लेखोरांना इशारा

0

सलमान खानवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यानतंर ते आता सैफवर झालेल्या हल्ल्यापर्यंतच्या सर्वच घटना धक्कादायक आहे. सेलिब्रिटींवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे आणि त्यांना येणाऱ्या सततच्या धमक्यांमुळे सध्या बॉलिवूडमध्ये भितीचं वातावरण आहे. त्यामुळे आता सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सलमान खान आणि सैफ अली खानला त्यांच्यावरील हल्ल्यानंतर पोलिसांनी पूर्णपणे संरक्षण दिलं आहे. पण इतर कलाकारांचं काय? किंवा प्रत्येक कलाकारांना आता पोलीस संरक्षण द्यायचं का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कपिल शर्मासह अनेक कलाकरांना जीवे मारण्याची धमकी

सैफवरील हल्ल्याचं प्रकरण शांत होत नाही तोच कॉमेडियन कपिल शर्मा आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमकी आली. केवळ कपिल शर्मालाच नाही, तर त्याच्या सहकलाकारांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कपिल शर्माच्या आधी अभिनेता राजपाल यादव, कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि कॉमेडियन सुगंधा मिश्रा यांनाही अशा प्रकारचे धमकीचे ईमेल आले आहेत.

कॉमेडियन सुनील पालचा व्हिडीओद्वारे धमकी देणाऱ्यांना थेट इशारा

याच प्रकारावर आता कॉमेडियन सुनील पाल यांने एका व्हिडीओद्वारे हल्लेखोरांना आणि अशा धमक्यांचे इमेल पाठवणाऱ्यांना थेट इशाराच दिला आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमाला बोलवण्याच्या बहाण्याने सुनील पालचे अपहरण केल्याचा प्रकार घडला होता. या सर्व घटनांवर नाराजी व्यक्त करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये सुनील पाल याने बऱ्याच गोष्टींवर भाष्य केलं आहे. “सेलिब्रिटांना त्रास देणं चांगलं नसून, तुम्ही हे जे करताय तो कलेचा अपमान आहे म्हणजे साक्षात तुम्ही सरस्वती देवीचा अपमान करताय त्यामुळे हे करून तुम्ही पाप करताय” असं म्हणत सुनीलने थेट हल्लेखोर, धमकी देणाऱ्या त्या लोकांना इशारच दिला आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

‘असं केलं तर पाप लागेल…’

एवढच नाही तर त्याने पुढे म्हटलं की, “ज्या कलाकारांना तु्म्ही धमकी देताय, हल्ले करताय ते कलाकार स्वत:च्या हिंमतीने वर आले आहेत. तुम्हीही असचं काहीतरी मेहनत करा आणि चांगल काम करा, हे असं दृष्ट काम करून तुम्हाला काय मिळणार आहे?” असा सवाल विचारत सुनीलने समाजकंठकांना त्याच्या भाषेत समज देण्याचा प्रयत्न केला.

धमकीचे ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव विष्णू

दरम्यान ज्या सेलिब्रिटींना जीवे मारण्याची धमकीचे इमेल आले आहेत त्या ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव विष्णू असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आयपी ॲड्रेस आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे धमकी देणाऱ्या त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

ईमेलमध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, ‘आम्ही हे पब्लिसिटी स्टंटसाठी करत नाही आहोत. तुमच्या सर्व उपक्रमांची माहिती आमच्याकडे आहे. आम्ही पुढील 8 तासांमध्ये तुमच्या उत्तराची अपेक्षा आहे. आम्हाला कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास, तुम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेत नाही असे आम्ही मानू.’ जीवे मारण्याची धमकी आलेल्या सेलिब्रिटींना वेगवेगळ्या वेळी धमकीचे ईमेल आले आहेत. त्यामुळे आता सैफनंतर हे नवीनच प्रकरण समोर आल्यानंतर बॉलिवूडमध्ये दहशतीचं वातावरण आहे.