टीम इंडियाच्या या खेळाडूची कर्णधारपदी निवड Wtc Final नंतर टीम मॅनेजमेंटचा मोठा निर्णय

0

मुंबई: टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 209 धावांनी पराभव झाला. ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने इंडियाला विजयासाठी 444 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाला 234 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलिया या विजयासह वर्ल्ड चॅम्पियन ठरली. तर टीम इंडियाचं सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. या पराभवानंतर टीम इंडियावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. टीम इंडियाचा कर्णधारच बदलावा, अशी मागणी केली जात आहे. या दरम्यान आता मोठी बातमी समोर आली. टीम इंडियाच्या खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद

टीम इंडियासाठी टी 20 क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या शिवम मावी याला लॉटरी लागली आहे. वेगवान गोलंदाज शिवम मावी याला दुलीप ट्रॉफीसाठी सेंट्रल झोनचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. शिवम मावी हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशचं प्रतिनिधित्व करतो. मावीने टीम इंडियाकडून 6 टी 20 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. शिवमने या 6 सामन्यांमध्ये 7 विकेट्स घेतल्या आहेत.

नुकतंच आयपीएल 16 व्या मोसमाची सांगता झाली. शिवम या 16 व्या मोसमात गुजरात टायटन्स टीमकडून भाग होता. दुर्देवाने शिवमला प्लेइंग इलेव्हमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. शिवमने आयपीएल कारकीर्दीतील 32 सामन्यांमध्ये 30 विकेट्स घेतल्या आहेत.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

टीममध्ये आयपीएल स्टार रिंकू सिंह

दरम्यान दुलीप ट्रॉफीसाठी सेंट्रल झोनमध्ये आयपीएल 16 व्या मोसमाचा हिरो ठरलेला रिंकु सिंह याचाही समावेश करण्यात आला आहे. रिंकू आयपीएलच्या 16 व्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सकडून एकूण 14 सामने खेळला. रिंकूने या सामन्यात 4 अर्धशतकांच्या मदतीने 474 धावांची खेळी केली. तसेच गुजरात टायटन्स विरुद्ध शेवटच्या ओव्हरमधील शेवटच्या 5 बॉलमध्ये 5 सिक्स ठोकत अशक्य असा विजय मिळवून दिला.

दुलीप ट्रॉफीसाठी सेंट्रल झोन टीम

शिवम मावी (कॅप्टन), उपेंद्र यादव (उपकर्णधार), विवेक सिंह, हिमांशु मंत्री, कुणाल चंदेला, शुभम शर्मा, अमनदीप खरे, रिंकू सिंह, अक्षय वाडकर, ध्रुव जुरेल, सौरभ कुमार, मानव सथर, सारांश जैन, आवेश खान आणि यश ठाकुर.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता