मुंबई पहिल्या दिवशीच ढेर, JK 54 धावांनी आघाडीवर, टीम इंडियाचे खेळाडू फ्लॉप

0

रणजी ट्रॉफी 2024-2025 या स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्याला गुरुवार 23 जानेवारीपासून सुरुवात झाली. बीसीसीआयच्या आवाहनानंतर टीम इंडियाचे खेळाडूही रणजी ट्रॉफीत खेळणार असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. हे खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये तुलनेने नवख्या क्रिकेटपटूंसमोर कशी कामगिरी करतात? याकडे साऱ्यांचं लक्ष होतं. मात्र कसलं काय? टीम इंडियासाठी खेळणाऱ्या मुंबईकर खेळाडूंनी क्रिकेट चाहत्यांनी निराशा केली. जम्मू काश्मीरने बीकेसीत मुंबईविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ आपल्या नावावर केला. जम्मू-काश्मीरने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 54 धावांची आघाडी घेतली आहे.

जम्मू काश्मीरने मुंबईला 33.2 ओव्हरमध्ये 120 रन्सवर गुंडाळलं. त्यानंतर पाहुण्यांनी खेळ संपेपर्यंत 42 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 174 धावा केल्या आहेत. कॅप्टन पारस डोग्रा 19 आणि युद्धवीर सिंह चरक 2 धावांवर नाबाद आहेत. जम्मू-काश्मिरसाठी ओपन शुबम खजुरिया याने सर्वाधिक 53 धावा केल्या. तर आबिद मुश्ताक याने 44 धावांचं योगदान दिलं. तर एकाने 29 तर दोघांनी प्रत्येकी 19-19 धावा जोडल्या. तर इतर झटपट आऊट झाले. मुंबईकडून मोहित अवस्थी याने तिघांना बाद केलं. शम्स मुलानीने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर शिवम दुबे आणि शार्दूल ठाकुर या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

अधिक वाचा  राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकांसाठी या नेत्यांची विभागनिहाय ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून नियुक्ती जबाबदारी दिलेल्या नेत्यांची नावे जाहीर; सविस्तर वाचा!

टीम इंडियातील सक्रीय मुंबईकर खेळाडू फ्लॉप

जम्मू विरूद्धच्या सामन्यासाठी मुंबई संघात टीम इंडियासाठी खेळणाऱ्या 6 खेळाडूंचा समावेश आहे. शार्दूल ठाकुर आणि अंजिक्य रहाणे हे दोघे सध्या टीम इंडियात नाही. मात्र दोघांचा अपवाद वगळता रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे हे 4 खेळाडू टीम इंडियासाठी सातत्याने खेळत आहेत. या चौघापैंकी शिवमचा अपवाद वगळता इतर तिघांची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड करण्यात आली आहे. मात्र त्याआधीच हे खेळाडू या सामन्यातील पहिल्या डावाच अपयशी ठरले. त्यामुळेच मुंबईचा पहिला डावा हा 33.2 ओव्हरमध्ये 120 रन्सवर आटोपला.

अधिक वाचा  नगराध्यक्षांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत आनंदाची बातमी, सदस्यत्व व मताधिकार सरकार हा अध्यादेश काढणार

मुंबईची बॅटिंग

मुंबईकडून पहिल्या डावात फक्त चौघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. तिघांनी तर भोपळाही फोडला नाही. तर बाकी स्वसतात तंबूत परतले. शार्दूल ठाकुर याने 57 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 5 फोरसह सर्वाधिक 51 रन्स केल्या. तनुष कोटीयन याने 26, कॅप्टन अजिंक्य रहाणे याने 12 आणि श्रेयस अय्यरने 11 धावा केल्या.

तर रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि हार्दिक तामोरे हे पहिले 3 फलंदाज ढेर झाले. यशस्वीने 4 धावा केल्या. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी इथेही यशस्वीरित्या कायम ठेवली आणि 3 धावा करुन माघारी परतला. तर हार्दिक तामोरे याने 7 धावा जोडल्या. तर कर्ष कोठारी नाबाद परतला. जम्मू-काश्मीरसाठी उमर नझीर आमि युद्धवीर सिंह या दोघंनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या. तर औकीब नबीने 2 विकेट्स घेत चांगली साथ दिली.

अधिक वाचा  भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे

मुंबई प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शिवम दुबे, शार्दुल ठाकुर, शम्स मुलानी, तनुष कोटीयन, मोहित अवस्थी आणि कर्ष कोठारी.

जम्मू-काश्मीर प्लेइंग ईलेव्हन : पारस डोगरा (कॅप्टन), शुभम खजूरिया, विवरांत शर्मा, अब्दुल समद, कन्हय्या वधावन (विकेटकीपर), औकिब नबी डार, यावर हसन, युद्धवीर सिंह चरक, आबिद मुश्ताक, उमर नझीर मीर आणि वंशज शर्मा.