वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती? कोर्टात धक्कादायक खुलासे, १० दिवसांच्या कोठडीची मागणी

0

खंडणीच्या गुन्ह्यात सीआयडीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराडची मंगळवारी कोठडी संपत आहे. त्याला केज कोर्टासमोर हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी पक्षाच्या वकिलांनी कराडला १० दिवसांची सीआयडी कोठडी मागितली. वाल्मिक कराडच्या संपत्तीबद्दल सरकारी वकिलांनी कोर्टाला अवगत केलं. वाल्मिकची मोठ्या प्रमाणावर संपत्ती असल्याची माहिती मिळत असून ही संपत्ती भारताबाहेरही असू शकते, असा युक्तिवाद करण्यात आला. त्यामुळे त्याला खंडणीच्या प्रकरणात आणखी १० दिवस सीआयडी कोठडी मागण्यात आलेली आहे.

सरकारी वकील शिंदे हे सरकारी पक्षाची बाजू मांडत आहेत. तर सिद्धेश्वर ठोंबरे हे वाल्मिक कराडची बाजू केज कोर्टामध्ये मांडत आहेत. सरकारी पक्षाच्या वतीने दहा दिवसांची कोठडी मागितल्याचं मीडिया रिपोर्टनुसार कळतंय. यापूर्वी वाल्मिकला १४ दिवसांची कोठडी मिळाली होती.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

दरम्यान, १२ डिसेंबर २०२४ पासून फरार असेलला वाल्मिक ३१ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यात सीआयडी कार्यालयात शरण आला. त्यानंतर त्याला फरार होण्यासाठी मदत करण्यांची चौकशी करण्यीच मागणी होत आहे. एवढंच नाही तर खुद्द धनंजय मुंडेंच्या बंगल्या पोलिसांसोबत बैठक झाल्यानंतर वाल्मिक फरार झाला, आसा आरोप बजरंग सोनवणे यांनी केला आहे.

खंडणीच्या प्रकरणात सीआयडीने वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने घेतले आहेत. ते नमुने आवादा कंपनीचे सुपरवायझर शिंदे यांच्या आवाजाशी मिळतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. कारण शिंदेंच्या मोबाईलमधून मोबाईल कॉल डेटा सीआयडीला मिळालेला आहे. मात्र विष्णू चाटेचा मोबाईल अखेर सीआयडीला मिळालाच नाही. शेवटी विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी मिळाली.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा