मकर संक्रांतीचा देशभरात उत्साह दिसून येत आहे. या उत्सवाहात पतंग उडवण्याची मजा काही औरच आहे. उत्तरायणाच्या या पर्वात देशाचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांना सुद्धा मोह आवरला नाही. त्यांनी पतंगाची दोर हातात घेतली. पतंगांनी भरलेल्या आकाशात त्यांच्या पतंगाने भरारी घेतली. ढील दे, ढील दे दे रे भैया… इस पतंग को ढील दे असा माहोल तयार झाला नी त्यांच्याच एका समर्थकाने त्यांचा पतंग कापला. त्यावेळी एकच जल्लोष झाला. पतंग कापल्यानंतर अमित शाह यांनी तो कुठे हरवला हे सुद्धा निरीक्षण केले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे पण उपस्थित होते.
उत्तरायण पतंग महोत्सवात सहभागी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल या दोघांनी अहमदाबाद शहरात मकर संक्रांतीचा उत्सव आठवणीत साठवला. अमित शाह आणि भूपेंद्र पटेल हे अहमदाबाद शहरातील ‘उत्तरायण पतंग महोत्सवात’ सहभागी झाले. यावेळी त्यांनी स्थानिक लोकांशी चर्चा केली. याठिकाणी त्यांच्या समर्थकांनी आणि जनतेने त्यांचे स्वागत केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मकर संक्रांतीला पतंग उडवण्याचा आनंद लुटला. यावेळी एकच जल्लोष झाला.