‘सयाजी’ बॉलिवूड ते साऊथ ‘वटवृक्षी’ डंका स्पॉटलाईट ग्लॅमर बाजूला सारत सामाजिक भान हीच खरी लोकप्रियता; संघर्षाबद्दल जाणून घ्या

0

मुंबई- काही महिन्यांपूर्वीच मराठमोळे पण मराठीसोबतच साऊथमध्ये सुद्धा प्रसिद्ध असलेल अभिनेते सयाजी शिंदे यांनी राजकारणात प्रवेश केला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. सयाजी शिंदे आज त्यांचा ६६ वा वाढदिवस साजरा करत आहे. सयाजी शिंदे आजच्या काळात मराठी, साऊथ तसे बॉलिवूडमधला लोकप्रिय चेहरा असले तरी एकेकाळी त्यांना पैशांसाठी वॉचमनचं काम करावं लागलं होतं.

चित्रपटात भूमिका मिळवण्यासाठी सयाजी शिंदे यांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागले. अनेकदा तर त्यांना चित्रपटांमधून नकाराचा सामना करावा लागला, नंतर त्यांच्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी हिंदीतच नाही तर मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही नाव कमावले, आता सयाजी शिंदे राजकारणात उतरले आहेत.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

सयाजी शिंदे यांचा जन्म महाराष्ट्रातील एका शेतकरी कुटुंबात झाला. इतरांप्रमाणे सयाजी शिंदे यांनाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करावे लागत होते. आपल्या मुलाने चांगले शिक्षण घ्यावे अशी त्यांच्या पालकांची इच्छा होती कारण सयाजी शिंदे अभ्यासात फार हुशार होते. अभ्यासासोबत पैसे कमवण्यासाठी ते चौकीदार म्हणून काम करू लागले. सयाजी शिंदे यांना वॉचमनच्या नोकरीतून महिन्याला १६५ रुपये मिळायचे. पुढे त्यांना क्लार्कची नोकरी लागली.

सयाजी शिंदे यांना पुढे बँकेत नोकरी लागली. यादरम्यान त्यांची भेट सुनील कुलकर्णी यांच्याशी झाली, ते थिएटरमध्ये काम करायचे. इथेच सयाजी शिंदे यांचे मत बदलले. पुढे त्यांनी नोकरीसोबतच नाटकात काम करण्यास सुरुवात केली. सयाजी त्यावेळी अनेक मराठी नाटकांमध्ये काम करत होते, पण १९८७ मध्ये आलेल्या झुलवा या नाटकातील त्यांचा अभिनय लोकांना आवडला. सोबतच तब्बल १७ वर्षे ते बॅंकेची नोकरी करतच होते.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

मुंबईत संघर्ष

अभिनयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सयाजी शिंदे मुंबईत आले. आपण हिरो व्हायचे असे स्वप्न त्यांनी कधीच पाहिले नव्हते. त्यांना केवळ उत्तम नट व्हायचे होते. सयाजी शिंदे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते – जर मी चित्रपटात खलनायकाची भूमिका केली तर लोकांनी मला खलनायक मानावे असे मला वाटते. मराठीसोबतच त्यांनी बऱ्याच साऊथकडील सिनेमांसुद्धा काम केले आहे. साऊथमध्ये ती खलनायक म्हणून सुपरहिट आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी चिरंजीवीसोबत गॉडफादर म्हणून काम केलेले. त्यांनी आतापर्यंत ३०० हून अधिक सिनेमे केले आहेत.

सयाजी शिंदे मराठी चित्रपटात काम करत होते पण त्यांचा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रवास सुरू झाला नव्हता. मग त्यांना शूल मुव्हीची ऑफर आली. या चित्रपटात त्यांनी बच्चू यादवची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर आपली छाप सोडली. सयाजी शिंदे अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसले आहेत.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

सयाजी शिंदे हे सामाजिक कार्यकर्तेही आहेत. ते लोकांना झाडे लावण्यासाठी आग्रह करत असतात. शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे त्यांना झाडाचे महत्व चांगलेच माहित आहे. त्यांनी स्वत: २५ हजारांहून अधिक झाडे लावली आहेत. अनेक चित्रपटांमध्ये राजकारण्यांची भूमिका साकारणारे सयाजी शिंदे आता खऱ्या आयुष्यात राजकारणी झाले आहेत.