सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; SBI मध्ये बंपर भरती

0

सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. कारण, स्टेट बँक ऑफ इंडियाने अर्ज मागवले आहेत. येथे स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार sbi.co.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरीचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. SBI ने स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (एससीओ) पदाच्या 169 जागांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाची ही भरती प्रक्रिया अभियांत्रिकी आणि संबंधित क्षेत्रातील पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार sbi.co.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

अर्ज करण्याची शेवटची तारीख

22 नोव्हेंबर 2024 पासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवार 12 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2024 आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्या पदांची भरती?

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भरतीमध्ये सहाय्यक व्यवस्थापक अभियंत्यासह इतर अनेक पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. या पदांसाठी उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील कौशल्य आणि अनुभव असणे आवश्यक आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरी सुवर्णसंधी आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमधील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील अनुभवही असणे आवश्यक आहे. या अटींची पूर्तता करणारे उमेदवारच या पदासाठी अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा आणि वेतन

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असावे. निवड झालेल्या उमेदवारांना 48,480 ते 85,920 रुपये मासिक वेतन दिले जाईल. याशिवाय अतिरिक्त भत्ते आणि लाभही बँकेकडून देण्यात येणार आहेत.

अर्ज कसा करावा?

सर्वप्रथम एसबीआयच्या वेबसाईटवर sbi.co.in. मुखपृष्ठावरील “चालू रिक्त जागा” दुव्यावर क्लिक करा. संबंधित पदाच्या लिंकवर क्लिक करा आणि अर्ज भरा. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि शुल्क जमा करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट कॉपी ठेवावी.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

SBI ची ही भरती केवळ आकर्षक वेतनच नाही तर स्थिरता आणि इतर भत्ते देखील देते. भारतातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत करिअर करण्याची ही उत्तम संधी आहे.