आज पुन्हा राजगर्जना! ज्यांना समर्थन त्यांच्या विरोधात उमेदवार काय भूमिका? कोथरूडमध्ये चर्चेचा विषय

0
1

कोथरूड विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकृत उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचारार्थ आज कोथरूड मधली पहिली जाहीर सभा ‘राजगर्जने’ने सुरू होत आहे. मुळात विजयी झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याची जाहीर भूमिका घेतलेल्या राज ठाकरे यांनी आज कोथरूड मध्ये भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या विरोधात काय भूमिका घेतात हा खरा कोथरूडमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सलग या विधानसभा मतदारसंघात निवडणुका लढत आहे. सन 2009 साली जन आशीर्वादाच्या मोठ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवता आली त्यानंतर मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाटचाल काहीशी लयास गेल्याचे चित्र असताना 2019 च्या निवडणुकीमध्ये मात्र अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसच्या मदतीने पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मतदारसंघात महायुतीच्या विरोधात लक्षणीय मते घेत निर्णय काम केले होते. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यानंतर या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक वेगळी ताकद आहे; याची जाणीव संपूर्ण महाराष्ट्राला असताना केवळ स्थानिक पातळीवर सक्रिय संघटना नसल्यामुळे या मतदारसंघांमध्ये मनसे अडखळत वाटचाल करत असलेल्या मनसैनिकांना राज ठाकरे कोणता मूलमंत्र देणार हा खरा विषय आहे.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

कोथरूड विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विजय मिळवण्यासाठी सलग चार प्रयत्न केले असतानाही त्यांच्या पदरी सतत येत असलेल्या अपयश अन दोन वेळा क्रमांक दोन ची जागा मिळवूनही कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाटचाल लक्षणीय करण्यासाठी आजची सभा खरी महत्त्वाची ठरणार आहे. 2019 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या विधानसभा मतदारसंघांमध्ये लक्षणीय मते घेत थेट लढतीमध्ये चांगली कामगिरी केली असली तरी या कामगिरीच्या पाठीमागे असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी यंदा शिवसेनेच्या पाठीमागे असून या बदललेल्या गणितावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कशी मात करणार आणि राज साहेब ठाकरे मनसैनिकांना कोणते मार्गदर्शन करणार याची चर्चा सध्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात सुरू आहे.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे