महायुती तयारी सुरू गाफील राहू नका, प्राण फुंकण्याचा प्रयत्न आत्ता ताकही….! मुख्यमंत्र्यांचा सल्ला

0

महायुतीने विधानसभेसाठी आता कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा महाविकास आघाडीवर वचपा काढण्यात येणार आहे. त्यासाठी आतापासून राजकीय जमीन कसण्याचे काम महायुतीने सुरु केले आहे. सुरुवातच घरापासून करण्यात आली आहे. महायुतीमधील घटक पक्षांनी आज मुंबईत मंथन, चिंतन आणि डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या मेळाव्यात बोलताना धडाकेबाज सुरुवात केली. त्यांनी महायुतीचे आमदार, पदाधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.

मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महायुतीचा मेळावा झाला. यावेळी तीनही घटक पक्षातील आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचे तीनही वरीष्ठ नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार भाषण करुन कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला.

आता ताकही फुंकून प्यायचंय…..

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये डबल इंजिन सरकार असताना महायुतीला मोठा फटका बसला. राज्यात महाविकास आघाडीने मुसंडी मारली. महायुतीच्या मेळाव्यात अर्थातच या विषयाकडे गांभीर्याने पाहण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यावेळी मोलाचा सल्ला दिला. तर त्यांचे कानही टोचले. एकदा मार पडला आहे. आता गाफील राहू नका. आता ताकही फुंकून प्यायचं आहे, असे मुख्यमंत्र्यांनी कान टोचले.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

घोषणा करायच्या आणि पैसे आम्ही द्यायचे हे योग्य नाही

आपण शेतकऱ्यांपासून ते महिलांसाठीच्या अनेक योजना केल्या आहेत. आतापर्यंतच्या इतिहासात शेतकऱ्यांची जी काही नुकसान भरपाई आहे. त्यात अवकाळी आणि गारपीटमध्ये १५ हजार कोटी दिले. आपण एनडीआरएफचे निर्णय बदलले. दुप्पट केले. दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले. सततच्या पावसामुळे होणारे नुकसान आपण देतो. एक रुपयात पीक विमा देतो. मोदींनी सहा हजार दिले त्यात आपण सहा हजाराची भर दिली. गोगल गायींमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई कधी मिळत नव्हती. ती आपण दिली. महाविकास आघाडीने नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजार रुपये भरपाई देण्याची निर्णय घेतला. पण पैसे दिले नाही. आपण दिले. त्यांनी का नाही दिले. घोषणा करायच्या आणि पैसे आम्ही द्यायचे हे योग्य नाही, असे मुख्यमंत्र्यांनी मंत्र दिला.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

काँग्रेसवर फोडले खापर

तुम्ही शेतकऱ्यांना योजना दिल्या असत्या तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नसत्या. त्याला जबाबदार कोण. काँग्रेसने ५० वर्ष शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. तुम्ही जलयुक्त शिवार योजनाही बंद केली. आम्ही ती सुरू केली. आपण शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. हेलिकॉप्टरने गावाला जाऊ नको तर आठ ते १० तास गाडी चालवत जाऊ. वेळ वाया घालवू. त्या दहा तासात मी दहा हजार फायलींवर सही करेन, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

 कामातून उत्तर…..

मी आरोपांना उत्तर कामातून देतो. आरोप कितीही करा. आम्हाला विचलीत करू शकत नाही. आमचा फोकस कामावर आहे. लाडक्या भावालाही दिलंय की. त्यांना अप्रेन्टिशिपसाठी पैसे दिलेत. लाडकी बहीणमुळे ती योजना दबली गेली. पण ती व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचवावी लागेल. हे भावांबद्दल बोलत आहेत. हे बोलत आहेत. मुंबईतील यांच्या शाखांवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे बोर्ड लागले आहेत. इकडे घटनाबाह्य मुख्यमंत्री, बेकायदेशीर सरकार म्हणता आणि मुख्यमंत्री योजनेचे बोर्ड लावता. चांगलं आहे. आमचं सरकार देणारं आणि आम्ही देत राहणार आहोत, असे त्यांनी विरोधकांना बजावले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

..…..महायुतीचा विजय ही घोषणा!

विधानसभा निवडणूक होईपर्यंत महायुतीचा विजय असो हीच आपली घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मैं एकेला ही चला था, लेकिन लोग मिलते चले और कारवा बनता गया अशी शेरो शायरी त्यांनी केली. दोन वर्षांपूर्वी जनतेने जनामतासोबत झालेल्या विश्वासघाताचा बदला घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भक्कम साथ मला लाभली. भाजपच्या नेत्या आणि पदाधिकाऱ्यांनी मला भरपूर प्रेम आणि सहकार्य दिलं. मोदी शाह चट्टान की तरह माझ्यासोबत उभे राहिले. त्यांच्या काळात सगळं बंद होतं फक्त फेसबुक सुरू होत,असा टोला सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंना त्यांनी लगावला.