लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील प्राचार उद्या १८ मे रोजी संपणार आहे. मुंबईतील सहा जागांसह राज्यातील १३ जागांवर २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आज शुक्रवारी मुंबईत प्रचाराचा धडाका असणार आहे. राज्यात प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीची शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता सभा होणार आहे. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. ही सभा शिवाजी पार्कवर होणार आहे.






इंडिया आघाडीची सभा
महायुतीबरोबर महाआघाडीतील बड्या नेत्यांची आज शुक्रवारी सभा होत आहे. या सभेला इंडिया आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आपचे नेते अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत. ही सभा संध्याकाळी सहा वाजता बीकेसी मैदानावर होणार आहे. या सभेला राहुल गांधी उपस्थित राहणार नाही.
राहुल गांधी गैरहजर
इंडिया आघाडीच्या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी नसणार आहे. राहुल गांधी रायबरेली मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. त्या ठिकाणी २० मे रोजी मतदान आहे. यामुळे या सभेला राहुल गांधी येणार नाही. परंतु १८ मे रोजी इंडिया आघाडी संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.
अजित पवार असणार का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोला अजित पवार यांची उपस्थिती नव्हती. त्यांना घशाच्या संसर्ग झाल्यामुळे ते नव्हते. त्यामुळे आज होणाऱ्या सभेला अजित पवार असणार का? हा एक प्रश्न आहे.
दादरमधील वाहतुकीत बदल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर दादर परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. दादर परिसरात अनेक ठिकाणी वाहनांसाठी नो पार्किंग झोन असणार आहे. मुख्य मार्गावर वाहतुकीत करण्यात आला आहे. शुक्रवारी दादरमधील अनेक रस्ते गरजेनुसार वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. सावरकर मार्ग, केळुस्कर रोड, केळकर मार्ग या रस्त्यावर पार्किंग करता येणार नाही. सभेसाठी येणाऱ्या वाहनांसाठी देखील विशेष पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.











