सदा सरवणकर यांनी विजयाचा ‘राजमार्ग’ असा केला सुकर; महायुती आणि मनसे सर्वच अचंबित

0

मुंबईतील माहीम विधानसभेत आता तिरंगी लढत निश्चित झाली आहे. मनसेचे अमित ठाकरे , शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत हे एकमेकांना भिडणार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे विद्यामान आमदार सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने आता माहीम मतदारसंघात जबरदस्त ट्विस्ट निर्माण झाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सदा सरवणकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार की नाही, याबाबत सतत चर्चा रंगल्या होत्या. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र काल सकाळपासून सदा सरवणकर अनेकांच्या भेटीगाठी घेत होते. त्यानंतर जवळपास दुपारी 2 नंतर ते राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी रवाना झाले. मात्र राज ठाकरेंनी त्यांची भेट नाकारली. मात्र याआधी सदा सरवणकर माध्यमांशी बोलताना अनेकदा मनसेने आपले उमेदवार मागे घ्यावेत, अशी मागणी करताना दिसले.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

सदा सरवणकरांनी शेवटच्या दिवशी मोठा गेम खेळला-

अमित ठाकरे माहीम विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने हा मतदारसंघ जास्त चर्चेत आला. माध्यमांचं देखील सतत या मतदारसंघाकडे लक्ष होतं. समाधान सरवणकर, सदा सरवणकर सतत माध्यमांशी संवाद साधत होते. तसेच मी उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, असा दावाही सतत करण्यात येत होता. राज ठाकरेंच्या भेटीसाठी जाण्याआधी देखील सदा सरवणकर सतत माध्यमांच्या संपर्कात असल्याचे दिसून आले. सकाळपासून-दुपारपर्यंत सदा सरवणकर माध्यमांना प्रतिक्रिया देत होते. मनसेने महायुतीविरोधात जे उमेदवार उभे केले आहेत, ते मागे घ्यावे…त्यानंतर मी माहीममधून माघार घेतो, असं सदा सरवणकर म्हणत होते. सदा सरवणकर हे ज्या क्षणाला म्हणाले, त्याच क्षणाला त्यांचा इरादा स्पष्ट झाला होता. त्यानंतर काल दिवसभर मिडिया कव्हरेज आणि स्वत:वर फोकस ठेवताना सदा सरवणकर दिसून आले.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

 

नेमकं काय घडलं?

माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि सदा सरवणकर काल राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले. पण राज ठाकरेंनी भेट नाकारल्याचं दिसून आलं. याबाबत माहिती देताना सदा सरवणकर म्हणाले की, माझा मुलगा आणि माझे चार पदाधिकारी हे भेटायला गेले होते आणि त्यांनी वेळ मागितली होती की बाजूलाच पप्पा आहेत. ते आपल्याला भेटू इच्छितात. आणि निवडणुकीच्या बाबतीत बोलू इच्छितात. त्यावर मला काही बोलायचं नाही, तुम्हाला मागे घ्यायचे असेल तर घ्या, नाहीतर लढा, असं राज ठाकरेंनी निरोप पाठवला. त्यामुळे कुठलही त्यापुढचं बोलणं झालं नाही. राज ठाकरेंनी भेट सुद्धा नाकारली, असं सदा सरवणकर यांनी सांगितले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

भाजपची साथ कुणाला?

भाजपच्या आशिष शेलारांनी आपण अमित ठाकरेंना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करु असं म्हटलंय. तर नारायण राणेंनी महायुतीच्या उमेदवारालाच निवडून आणू असं सांगितलंय. त्यामुळं माहीममध्ये काय होणार? भाजप अधिकृतरित्या कोणाला पाठिंबा देणार? भाजपचे नेते नेमकं कोणाच्या प्रचारसभेत दिसणार? हेच पाहावं लागणार आहे.