महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची यादीत आश्चर्यकारक नावे पहायला मिळत आहेत.






महाराष्ट्रात सत्तापरिवर्तनाचा प्रण घेतलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार कोण असतील याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलीय. त्यातच उद्धव ठाकरेंच्या पक्षाची संभाव्य 30 उमेदवारांची यादी समोर आलीय… ठाकरेंच्या या यादीत आयारामांचा बोलबाला पाहायला मिळतोय…. ठाकरेंच्या यादीत चौदा विद्यमान आमदारांव्यतिरिक्त अजून 16 नावं समोर येतायहेत.. त्यापैकी 9 म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक आयारामांना संधी देण्यात आलीय. त्यामुळे निष्ठावंतांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यताय.
शिवसेना ठाकरे पक्षाची ही सगळी खेळी निवडणुका जिंकाण्यासाठी असल्याचं म्हणत संजय शिरसाठ यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. यंदाची विधानसभा निवडणुक ही ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अस्तित्वाची असणार आहे.. या निवडणुकीचे निकाल हे ठाकरेंच्या शिवसेनेचं भवितव्य ठरवणार आहे.. त्यामुळे दुसऱ्या पक्षातील बडे मोहरे टीपून ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे.. आयारामांना मानाचं पान देत असताना संकटातही सोबत असणारे शिवसैनिक नाराज होणार नाहीत याची काळजी ठाकरेंना घ्यावी लागणार आहे.
ठाकरेंच्या यादीत आयारामांचा बोलबाला (हेडर)
1. स्नेनल जगताप – महाड
– काँग्रेसमधून शिवसेना ठाकरे गटात
– पक्षप्रवेश – 6 मे 2023
2. अद्वय हिरे – मालेगाव बाह्य
– भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात
– पक्षप्रवेश – 27 जानेवारी 2023
3. दीपेश म्हात्रे -डोंबिवली
– शिवसेना शिंदे गटातून शिवसेना ठाकरे गटात
– पक्षप्रवेश 6 ऑक्टोबर 2024
4. किशन तनवाणी – संभाजीनगर मध्य
– शिवसेनेतून भाजप पुन्हा शिवसेना असा प्रवास
5. राजू शिंदे – संभाजीनगर
– भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात
– पक्षप्रवेश – 7 जुलै 2024
6. दिनेश परदेशी – वैजापूर
– भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात
– पक्षप्रवेश – 12 सप्टेंबर 2024
7. सुरेश बनकर- सिल्लोड
– भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात
– पक्षप्रवेश – 18 ऑक्टोबर 2024
8. राजन तेली – सावंतवाडी
– भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात
– पक्षप्रवेश -18 ऑक्टोबर 2024
9. दीपक साळुंखे – सांगोला
– राष्ट्रवादी AP मधून शिवसेना ठाकरे गटात
– पक्षप्रवेश – 18 ऑक्टोबर 2024











