‘त्याचं संपूर्ण कुटुंब खोटं बोलतंय, आता त्याने दुसरा गुन्हा केलाय…’, सलीम खान यांच्या वक्तव्यावर बिश्नोई समाज संतप्त

0

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा सलमान खान (Salman Khan) बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असल्याचं ठळक झालं. सलमानसोबत जवळचे संबंध होते म्हणूनच हत्या केली असं म्हणत बिश्नोई गँगने हत्येची जबाबदारीही स्वीकारली. त्यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ झाली. पण यासगळ्यामध्ये सलमानचे वडील सलीम खान (Salim Khan) यांच्या एका वक्तव्याने बरीच खळबळ माजवली आहे.

हम साथ साथ हैं या सिनेमाच्या शुटींगदरम्यान काळवीटाची शिकार केली असल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर सलमानला या प्रकरणी शिक्षा देखील सुनावण्यात आली. पण सलीम खान यांनी नुकतीच एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये सलमानने ही शिकार केलीच नाही, असं वक्तव्य केलं. त्यावर आता बिश्नोई समाजाची संतप्त प्रतिक्रिया समोर आलेली आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

बिश्नोई समाज संतप्त

अखिल भारतीय बिश्नोई महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र बिश्नोई यांनी नुकतीच एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. सलीम खान यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येबाबत आम्हाला काही माहिती नाही. पण सलमान खानने बिश्नोई समाजाची माफी मागायला आहे. सलमाने काळवीटाची शिकार केलेली आहे आणि हे दु:ख बिश्नोई समाज गेली 24-25 विसरला नाही. लॉरेन्सही याचमुळे दु:खी आहे. त्यामुळे सलमानने माफी मागून प्रायश्चित करायला हवंय.. त्याने खूप मोठी चूक केलीये.

‘सलमानने आता दुसरा गुन्हा केलाय…’

पुढे त्यांनी म्हटलं की, त्याच्या वडिलांनी म्हटलं की, सलमान खानने शिकार केलीच नाही. मग ते काळवीट कसं मेलं? पोलीस आणि वन विभागाने तक्रार का दाखल केली? त्यानंतर न्यायालयाने त्याला शिक्षाही सुनावली, तो तुरुंगातही गेला… असं सगळं असताना हे सगळं खोटं होतं का? तो एकटाच खरा आहे का? सलमानचं पूर्ण कुटुंबच खोटं बोलतंय… सलीम खान यांनी बिश्नोई समाजावर खंडणीचाही आरोप केलाय. त्यामुळे सलमान खानने आधी शिकार करुन आणि आता पैशांचा आरोप करुन दुसरा गुन्हा केलाय….

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

सलीम खान यांनी काय म्हटलं?

सलीम खान म्हणाले की, “सलमाननं कधीही कोणत्याही प्राण्याची हत्या केली नाही. सलमाननं कधी साधं झुरळ मारलेलं नाही. आमचा हिंसाचारावर विश्वास नाही.” दरम्यान, एबीपी न्यूजसोबत संवाद साधताना, समीम खान यांनी लॉरेन्स बिश्नोईच्या वतीनं सलमान खानच्या माफीच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे.