अमित शहांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय, स्वत: मुख्यमंत्र्यांनी ट्विट करुन दिली माहिती

0
1

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. रविवारी रात्री त्यांच्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत काय घडलं याची माहिती ट्विटकरुन दिली. आगामी सर्व निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र लढवणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  ट्विटमध्ये म्हणाले की, काल, रविवारी रात्री मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीत राज्यातील आगामी लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका  शिवसेना आणि भाजप एकत्र लढवण्यावर निर्णय झाला.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

याशिवाय कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली.महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या 11 महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, रखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत.

यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड
अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार,असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?