मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो, पण.एक-दोघांवर माझा रोष; एकनाथ खडसेंनी पुन्हा भाजप नेतृत्वावर तोफ डागली

0

खाती नेमकी कशी मिळाली?

क्षाला ती बारा खाती देणं परिस्थितीने भाग पाडलं. त्या कालखंडात मुख्यमंत्रीपदाचा दावेदार मी होतो. देवेंद्र फडणवीस यांनी ही खाती मला दिलेली नव्हती.परिस्थितीनुसार पक्षाने मला ही खाती दिली. भारतीय जनता पार्टीने मला काहीच दिलेलं नाही, असं मी कधीच बोललेलो नाही. पण भाजपमधल्या एक दोन जणांवर माझा रोष आहे, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.पक्षाचा विस्तार करण्यामध्ये भाजपाने मला चांगला सन्मान दिला. 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं. पुन्हा येईल म्हणाले आणि सत्ता असताना देखील आपण कमी जागा का निवडून आणल्या?, असा सवाल खडसेंनी विचारला आहे.देवेंद्र फडणवीस हे मान्य करतील की त्यांना अध्यक्ष करण्यास मी प्रयत्न केला. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहास्तव मी देवेंद्र फडणवीस यांना अध्यक्ष पद द्यायला लावलं, असंही खडसे म्हणालेत.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

महाजनांवर टीकास्त्र

ज्यावेळेस भाजपमध्ये आमदार झालो होतो. तेव्हा गिरीश महाजन भाजपमध्ये कुठेही नव्हते. सरपंच असताना त्यांना मी गल्लोगल्ली फिरवलं. महाजन यांची कोणतीही सभा माझ्या शिवाय प्रचाराची पार पडली नाही. गिरीश महाजन आता मोठे झाले आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या वारस म्हणून गिरीश महाजन यांचं नाव पुढे यायला लागलं आहे. गिरीश महाजन अशा प्रसंगांमध्ये अडकलेले होते की त्या प्रसंगांमधून त्यांना मी बाहेर काढलं त्यांना मी बाहेर काढलं नसतं तर ते महाराष्ट्रातही दिसू शकले नसते, असं म्हणत खडसेंनी टीकास्त्र डागलंय.भाजप नेते विनोद तावडे यांच्यावरही एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विनोद तावडे आणि अनेक नेत्यांनी आम्ही वर्षं वर्ष सोबतकाम केलं आहे. माझा कोणत्याही स्थितीत भाजपमध्ये वापर होऊ नये, असं तावडेंना वाटणं स्वाभाविक आहे, असं खडसे म्हणाले.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार