अजित पवारांनी लायकी दाखवली अन् तुमची भाषा बदलली; संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर घणाघात

0
1

मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार  एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.अशात अजित पवारांनी ‘नो कमेंट्स’ म्हणत संजय राऊत यांच्याबद्दल बोलणं टाळलं होत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलत असताना शिरसाट यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र चालवलं आहे.

संजय शिरसाट म्हणाले, “अजित पवारांनी तुम्हाला एक खुट्टी काय ठोकली तुमची भाषा बदलली. तुम्हाला ज्या प्रकारची भाषा समजते, त्याच भाषेत अजित पवारांनी बरोबर तुम्हाला समजून सांगितलं आहे. अजित पवारांनी तुम्हाला तुमची लायकी दाखवल्यानंतर तुम्ही तुमचं स्टेटमेंट बदललं आहे.पुढे बोलताना ते म्हणाले, “संजय राऊत यांनी हे सर्व स्वतः स्वतःवर ओढवून घेतलं आहे. कारण तुम्हीच म्हणाले होते ज्याचं जळतं त्यालाच कळतं. सध्या तुमची जळून राख झालेली आहे. त्यामुळे आता तरी सुधारा.”दरम्यान, संजय राऊत यांच्यामुळे महाविकास आघाडी तुटणार का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देत अजित पवार म्हणाले, “जोपर्यंत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचा एकोपा आहे, तोपर्यंत मविआला काहीही होणार नाही.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे