सलमान खान फक्त नावाला, बिश्नोई गँगचा खरा गेम आहे दुसराच

0
1

माया नगरी मुंबई आणि बॉलिवूडवर 1990 च्या दशकापासून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यातून मुंबईत टोळी युद्ध भडकलं होतं. आता एनसीपी नेते आणि रियल एस्टेटमधील मोठे व्यावसायिक बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर परिस्थिती बदलली आहे. या घटनेमुळे बॉलिवूडमध्ये सुद्धा कंफ्यूजन आहे. उत्तर भारतात दबदबा निर्माण करणारा लॉरेंस बिश्नोई आता बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या करुन त्याने बॉलिवूडचा तसा संदेश सुद्धा दिला आहे. डी कंपनीची दादागिरी चालणार नाही, हे त्याने साफ संकेत दिलेत.

दाऊद इब्राहिम आता भाई राहिलेला नाही, हे लॉरेन्सने सांगण्याचा प्रयत्न केलाय. मुंबईत रियल एस्टेट आणि बॉलिवूडवर एकछत्र अमल ठेवण्यासाठी 90 च्या दशकात दाऊद इब्राहिम, छोटा शकील, अबू सालेम, छोटा राजन, हाजी मस्तान, करीम लाला, वरदराजन मुदलियार आणि अरुण गवळी अशा अनेक गँग्स तयार झाल्या. त्यावेळी मुंबईत भरपूर गँगवॉर झालं. रस्त्यावर खुलेआम गोळीबाराच्या घटना घडल्या. अखेर डी कंपनी सर्वांवर भारी पडली.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

बॉलीवूड ते रियल एस्टेटपर्यंत इच्छा नसतानाही डी कंपनीला हफ्ता द्यावा लागला. मुंबईतल्या गँग्समध्ये आजपर्यंत डी कंपनी सर्वात मोठी मानली जात होती. अनेक फिल्म्सचे स्क्रिप्ट, गाणी, अगदी हिरो-हिरॉईन दाऊदच्या इशाऱ्यावरुन बदलण्यात आले. वेळेबरोबर मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डच्या मुसक्या आवळल्या. दाऊद आज देशाबाहेर आहे. त्यामुळे डी कंपनीची मुंबई आणि बॉलिवूडवरची पकड आता कमजोर झाली आहे. अशा स्थितीत आता बिश्नोई गँग आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करतेय.

‘तुमचे दिवस आता संपले’

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येकडे त्या दृष्टीने पाहिलं जात आहे. बॉलिवूडमध्ये सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान यांच्या शब्दाला भरपूर किंमत आहे. हे तिघेही बाबा सिद्दीकीच्या कार्यक्रमात दिसायचे. आता गँगस्टर लॉरेंस बिश्नोईने बाबा सिद्दीकीची हत्या करुन या तिन्ही अभिनेत्यांना खासकरुन सलमान खानाला संदेश दिला आहे. त्याचबरोबर तुमचे दिवस आता संपले, हा डी कंपनीला सुद्धा संदेश दिला आहे. सलमानच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचा लॉरेन्स बिश्नोई गँगचा डाव आहे.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

आता फुलप्रूफ योजनेवर काम

लॉरेंस बिश्नोईची गुन्हेगारीची कारकीर्द 15 वर्षांपूर्वी सुरु झाली. मूळचा पंजाबचा असलेल्या लॉरेंसने संपत नेहरासोबत चंदीगडमध्ये गुन्हेगारीची सुरुवात केली. आधी हरियाणा, पंजाब आणि त्यानंतर दिल्लीत धाक निर्माण केला. त्यानंतर जगातील सात देशात नेटवर्क तयार केलं. सलमान खानला धमकी देण्यापासून त्यांनी सुरुवात केली. आता बॉलिवूडवर वर्चस्व मिळवण्याच्या फुलप्रूफ योजनेवर त्यांनी काम सुरु केलय.