ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रॉक, रुग्णालयात दाखल

0
30

महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकासमंत्री आणि ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांना ब्रेनस्ट्रोक आला आहे. त्यामुळे त्यांची तब्येत अत्यवस्थ झाली आहे. मधुकर पिचड यांना पहाटे ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर पिछड यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. ते अहमदनगर जिल्ह्यातील राजूर येथील राहत्या घरी असताना त्यांना ब्रेन स्ट्रोक आला. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. ते 83 वर्षांचे आहे. प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतर आता नाशिकच्या 9 पल्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर