तू है तो दिल धडकता है…, दुसऱ्या लग्नाची चर्चा, दुबईत कोणासोबत दिसली सानिया मिर्झा?

0

माजी टेनिसपटू सानिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत. आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सानिया तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. शोएब याच्यासोबत खुला केल्यानंतर सानिया हिने देखील दुसरं लग्न केलं… अशा चर्चांना उधाण आलं आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे सानिाय हिने शोएब मलिक याची तिसरी पत्नी सना जावेद हिच्या पहिल्या नवऱ्यासोबत लग्न केल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. सना जावेद हिच्या पहिल्या पतीचं नाव उमैर जसवाल असं आहे.

सना जावेद हिने शोएब याच्यासोबत दुसरं लग्न केलं आहे. त्याच प्रमाणे शोएब याचं देखील सना हिच्यासोबत तिसरं लग्न आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. दरम्यान, सानिया मिर्झा हिच्या देखील दुसऱ्या लग्नाच्या चर्चा रंगत असताना तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अधिक वाचा  भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे

सानिया हिचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ दुबईतील आहे. सानिया कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता अभिनेत्री दुबईतील एका मॉलमध्ये फिरताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये सानिया बहीण आणि मुलांसोबत फिरताना दिसत आहे.

बहीण अनम मिर्जा आणि मुलगा इजहान यांचं हात पकडून सानिया मॉलमध्ये फिरताना दिसत आहे. व्हिडीओसाठी सानिया हिने ‘तू है तो’ हे गाणं लावलं आहे. व्हिडीओमध्ये अनम मिर्झा हिची मुलगी देखील दिसत आहे. घटस्फोटानंतर सानिया बहीण आणि मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. सानिया तिच्या कुटुंबियांसोबत दुबईत राहते.

अधिक वाचा  संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता! लोकसभेत १५ बैठका, ९२ तास काम, १० विधेयके ८ मंजूरचे कामकाज

सांगायचं झालं तर, घटस्फोटानंतर शोएब याने नव्या आयुष्याची सुरुवात केली. पण सानिया मात्र दुबईतच राहिला. घटस्फोटानंतर सानियाने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर देखील सानिया स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील सानियाच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

सानिया हिच्या दुसऱ्या लग्नाचं सत्य
सानिया मिर्झा हिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल रंगणाऱ्या चर्चा फक्त आणि फक्त अफवा आहे. सानिया हिने दुसरं लग्न केलेलं नाही. यावर दोघांनी देखील अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. लग्नाच्या 10 वर्षानंतर शोएब आणि सानिया यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

अधिक वाचा  भाजपचा महाराष्ट्रभर झंझावात; पण येथे अख्ख्या पॅनलचं डिपॉझिट जप्त; पक्षाचा आलेला निधी देखील तळापर्यंत गेलाच नाही; प्रदेश पातळीवर मोठी खलबते होणार