शरद पवार पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, 6दिवसिय दौरा जाहीर; प्रकृती सुधारली मुंबईतून दुपारीच पुण्याकडे झालं रवाना

0

विधान परिषद निवडणुकीनंतर शरद पवार ॲक्शन मोडमध्ये आले असून नुकत्याच एका खाजगी वृत्त वाहिनीने जाहीर केलेल्या सर्व्हे नुसार महाविकास आघाडीला महाराष्ट्र मध्ये चांगले दिवस असल्याचे जाहीर झाल्यामुळे शरद पवार यांनी 6 दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्याची घोषणा केली आहे.

शरद पवार महाराष्ट्राच्या सहा दिवस दौऱ्यामध्ये पुणे परिसरातील कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले असून आजच शरद पवार दुपारी तीन वाजता पुणेसाठी रवाना झाले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने शरद पवार यांचा पुणे येथे बालगंधर्व येथे कार्यक्रम होणार आहे. मुंबईतील छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर कदाचित पुण्यामध्ये ही काही निष्ठावान आमदार शरद पवार यांना भेटण्याची शक्यता असून सहा दिवसाच्या दौऱ्यामध्ये ठिकठिकाणी शरद पवारांच्या गाठीभेटी घेण्याची शक्यता आहे. असंख्य आमदारही शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचे चर्चा सुरू झालेल्या आहेत.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

मागील आठवड्यामध्ये आजारी असलेल्या शरद पवारांची प्रकृती बरी असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे.