आर्थिकदृष्टया सबळ होण्यासाठी बौद्ध समाजाने शेअर बाजाराकडे वळावं – शैलेंद्र पवार

0

मुंबई दि. १६ (रामदास धो. गमरे) “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्राचे गाढे शिक्षण घेतले होते आणि आर्थिक बाबींवर त्यांचे महत्वाचे कार्य होते, त्यांनी कोलंबिया विद्यापीठात आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली होती. त्यांचा प्रबंध “The Problem of the Rupee: Its Origin and Its Solution” (१९२३) आणि “The Evolution of Provincial Finance in British India” (१९२५) यांमधून त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर सखोल विचार मांडला होता त्यांचे आर्थिक योगदान हे प्रामुख्याने अर्थशास्त्रीय संशोधन, चलन नीती आणि सामाजिक-आर्थिक समानतेवर आधारित होते त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेतील विषमता कमी करण्याच्या उपाययोजनांवर भर दिला त्यासाठी त्यांनी वयाच्या २६ व्या वर्षी “Stock & Shares” नावाची कन्सल्टन्सी सुरू केली होती परंतु बाबासाहेब दलित समाजातील असल्याने त्यांना शेअर होल्डर्स मिळाले नाही पुढे लंडन येथे जाऊन त्यांनी “The Problem of the Rupee: Its Origin and Its Solution” हा प्रबंध सादर केला ज्यावर आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची निर्मिती झाली ज्याद्वारे आज देशभरातील सर्वच बँका, पतसंस्था, सहकार क्षेत्र आर्थिक व्यवहार सुरू आहेत हे सर्व बाबासाहेबांची देणं आहे परंतु या आर्थिक उलाढालीत बौद्ध समाजाची किती प्रमाणात उन्नती होत आहे याचा विचार होणे आवश्यक आहे. आजवर आपल्या नजरेसमोर शेअर बाजार म्हणजे एक जुगार व त्यात पडणे म्हणजे आयुष्य उध्वस्त अस चित्र उभं करण्यात आलं परंतु खरच अस आहे का ? तस असत तर आज गर्भश्रीमंत उद्योगपती, व्यापरीवर्ग, नेते, सेलिब्रिटी, खेळाडू यांनी त्यात गुंतवणूक केली असती का ? बाबासाहेबांच्या प्रबंधावर भारतीय आर्थिक व्यवहाराचा डोलारा उभा असताना आज त्यांचाच समाज आर्थिक उन्नतीपासून वंचीत आहे खर पाहता शेअर बाजार हा आर्थिक विकासाशी जोडलेला आहे. शेअर म्हणजे एखाद्या कंपनीच्या एकूण भागभांडवलाचा (Total Capital) एक लहानसा भाग जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करता, तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे अंशतः मालक (Partial Owner) बनता. कंपनी नफा कमावते तेव्हा तुम्हाला त्या नफ्यातील काही हिस्सा (लाभांश / Dividend) मिळतो आणि जर कंपनीची कामगिरी चांगली झाली तर तुमच्या शेअरची किंमत वाढते, ज्यामुळे तुम्हाला फायदा होतो व आजच्या डिजिटल इंडियामध्ये शेअर बाजारात जोखीम ही अत्यंत कमी आहे काही ठराविक गणित समजून घेतली तर जोखीम विरहित (Risk Free) गुंतवणूक करून मोठा फायदा मिळवता येऊ शकतो म्हणून आर्थिकदृष्टया सबळ होण्यासाठी बौद्ध समाजाने शेअर बाजाराकडे वळाल पाहिजे” असे प्रतिपादन शासन प्रमाणित लेखापरीक्षक व निवडणूक निर्णय अधिकारी शैलेंद्र शांताराम पवार यांनी बौद्धजन सहकारी संघ आयोजित ऑनलाईन वर्षावास प्रवचन मालिकेचे दहावे पुष्प गुंफत असताना केले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

बौद्धजन सहकारी संघ संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक पातळीवर गाव शाखेच्या व मुंबई येथे मुंबई शाखेच्या एकमताने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत चाललेल्या वर्षावास प्रवचन मालिकेद्वारे गावागावात, घराघरात धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे महत्कार्य संघाच्या माध्यमातून करण्यात येत आहे, सदर प्रवचन मालिकेचे दहावे पुष्प बौद्धजन सहकारी संघ मुंबईचे कार्याध्यक्ष दीपक मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली Google Meet app द्वारे ऑनलाईन पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाले, सदर दहावे पुष्पाच्या प्रसंगी बौद्धजन सहकारी संघाच्या वेळंब विभाग क्र. ४ चे अध्यक्ष सुभाष मोहिते व परिवारास पूजेचा मान देऊन त्यांच्या शुभहस्ते पूजाविधी संपन्न करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार समितीचे सचिव सचिन मोहिते यांनी प्रभावी व लाघवी भाषाशैलीत केले तर अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुंबई कार्याध्यक्ष दीपक मोहिते यांनी “व्याख्याते शैलेंद्र शांताराम पवार यांनी ‘बौद्ध समाज आणि शेअर बाजार’ या विषयावर आपले विचार परखडपणे व प्रभावीपणे सौंदहरणासह मांडून आज समाजाला आर्थिकदृष्ट्या सबळ होण्यासाठी शेअर बाजारात गुंतवणूक करणे किती गरजेचे आहे हे पटवून दिले त्याबद्दल त्यांचे कौतुक केले व उपस्थितांचे आभार व्यक्त करीत आपण आजवर जशी साथ दिली ती अशीच कायम राहिली तर अजूनही उत्तमोत्तम कार्यक्रम यशस्वीपणे घेऊन धम्माचा प्रचार व प्रसार घरोघरी करता येईल” असे नमूद करीत सर्वांना मंगलकामना दिल्या.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

सदर कार्यक्रमास आजी-माजी विश्वस्त, आजी-माजी मध्यवर्ती कमिटी, त्यांचे चेअरमन, आजी माजी विभाग अधिकारी, गाव व मुंबई या दोन्ही शाखांतील सर्व सभासद, सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे तसेच वेळंब विभाग क्र. ४ चे अध्यक्ष सुभाष मोहिते परिवार व व्याख्याते शैलेंद्र शांताराम पवार, गाव व मुंबई शाखेचे आजी माजी विश्वस्त, आजी माजी कार्यकारिणी, उपासक, उपासिका, हितचिंतक व उपस्थितांचे आभार मानून संस्कार समितीचे सचिव सचिन मोहिते यांनी कार्यक्रमाची सांगता केली.