आगामी विधानसभा आम्ही महायुती म्हणूनच लढणार; निवडणूक काळात महायुतीचा ‘हाच’ चेहरा राहणार: अजित पवार

0

महाराष्ट्रातील जनते मध्ये माहिती सरकार विषयी सकारात्मक वातावरण असून विरोधकांनी कितीही अर्धवट केली असती तरी काम करणारे सरकार म्हणून महायुती सरकारची प्रतिमा दिवसेंदिवस बाबत असल्याने येणारी विधानसभा आम्ही महायुती म्हणूनच लढणार असल्याचे मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. 

महाविकास आघाडीकडून वारंवार महायुती बाबत संभ्रम केला जात असला तरी संपूर्ण निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हाच चेहरा राहणार असून एक कार्यकर्ता सर्वोच्च पदावरती कशाप्रकारे काम करतो याची चुणूक त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला जाणीव करून दिली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये महायुतीला भरघोस यश मिळणार या माध्यमातून बाबत शंका नाही असेही यावेळी अजित पवार यांनी सांगितले.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

बारामतीत अजित पवार लढणार की पार्थ पवार?

बारामतीत नुकताच जनसमान मेळावा पार पडला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व कॅबिनेट मंत्री यांनी माहिती सरकारच्या काळात केलेल्या कामांचा लेखाजोखा घेतला. त्याबरोबरच भावनिक आव्हानाला बळी न पडता विकासाच्या पाठीमागे उभे राहण्याची भूमिका घेण्याचे आवाहनही केले. परंतु माध्यमांमध्ये अजित पवार बारामती मधून लढणार की नाही या विषयावरती जास्त जोर देण्यात आला. याबाबत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत बारामतीत उमेदवार कोण? हा पक्षांतर्गत बैठकीत हा निर्णय ठरवला जाणार असल्याचे सांगितले.

संपूर्ण महाराष्ट्रात सर्व्हे केला जाणार-

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

महाराष्ट्रात या लोकसभेला भारतीय जनता पक्षाने सर्व केले होते. त्यानुसार महाराष्ट्रातील जागावाटप करण्यात आले परंतु त्याचा फटका महायुतीला बसला त्यामुळे यंदा आम्ही देखील सर्वे करणार आहोत. जागा वाटपाच्या वेळेस भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) बैठकीत प्रत्येक पक्ष आपला सर्वे समोर ठेवेल. त्यानंतर निर्णय घेतले जातील. असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.