हाथरस ‘यूपी’तील चेंगराचेंगरीनंतर महाराष्ट्राचा हा कायदा चर्चेत; राज्यसभेत कायद्याचा उल्लेख सभापतींकडून दखल

0

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर महाराष्ट्रातील जादूटोणाविरोधी कायदा चर्चेत आला आहे. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी राज्यसभेत या कायद्याचता उल्लेख केला. देशपातळीवरही असा कायदा करण्याची मागणी त्यांनी उचलून धरली.राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सभापती जगदीप धनकड यांनी हाथरस दुर्घटनेतील मृतांना श्रध्दांजली वाहिली. त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांनीही त्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी नकली बाबांचा उल्लेख केल्यानंतर सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतला.

काय म्हणाले खर्गे?

अनेक नकली बाबा पैशांसाठी लोकांना फसवत असून लोक अंधश्रध्देपायी त्यांच्याकडे जात असल्याचे खर्गे म्हणाले. अनेक नकली बाबा तुरुंगातही असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. काही खरे बाबा आहेत, त्यांना येऊद्या पण नकली बाबांविरोधात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कायद्याप्रमाणे देशपातळीवरही कायदा करावी, अशी मागणी खर्गे यांनी केली.सभापती धनकड यांनीही खर्गे यांच्या मुद्यावरून सभागृह नेते जे. पी. नड्डा यांना याची दखल घेण्याची सुचना केली. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये असलेल्या जादूटोणा कायद्याचे नाव महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 असे आहे. हे रोखण्यासाठी आहे महाराष्ट्रातील कायदा तथाकथित चमत्कारांचा प्रचार-प्रसार करून लोकांना फसवणे, ठगवणे आणि त्यांच्यावर दहशत बसवणे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

अमानुष, अघोरी, अनिष्ट प्रथांचा अवलंब करणे आणि तसे करण्यास इतरांना प्रवृत्त करणे, उत्तेजन देणे वा सक्ती करणे.

भूताचा वा अतिंद्रिय शक्तींचा कोप असल्याचा समज करून देऊन वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखणे. त्याऐवजी अमानुष, अनिष्ट, अघोरी कृत्य वा उपाय करायला प्रवृत्त करणे.

स्वतः अलौकिक शक्ती असल्याचा, कुणाचा अवतार असल्याचं असल्याचं भासवणे.